Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Bapya’ मधील Rajashri चा लुक! ‘शैलजापासून ते शैलेश’ एक अनोखा प्रवास, प्रेक्षकांकडून मोठी पसंती

बाप्या या मराठी चित्रपटातील राजश्री देशपांडे हिचा शैलजापासून शैलेशपर्यंतचा प्रवास सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तिचा अनोखा लूक, देहबोली आणि अभिनय प्रेक्षकांना भावनिकरीत्या जोडून ठेवत आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 21, 2026 | 02:35 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

प्रेम, नाती आणि मैत्री यांची वेगळी बाजू उलगडणारा मराठी चित्रपट बाप्या सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून चित्रपटातील संवेदनशील कथा, दमदार अभिनय आणि विशेषतः अभिनेत्री राजश्री देशपांडे हिचा अनोखा लूक चर्चेचा विषय ठरत आहे. शैलजापासून शैलेशपर्यंतचा तिचा प्रवास प्रेक्षकांना भावनिकरीत्या जोडून ठेवत असून सोशल मीडियावरही तिच्या व्यक्तिरेखेची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

‘आई तुळजाभवानी’मध्ये रंगणार महादेव-तुळजाभवानीचा भव्य विवाहसोहळा; १५० हून अधिक कलाकार, भव्य सेट अन् दिव्य सजावट

चित्रपटांमध्ये स्त्री पात्रांनी पुरुषी वेष धारण केलेली उदाहरणे यापूर्वीही पाहायला मिळाली आहेत. मात्र ‘बाप्या’मधील शैलजाचा प्रवास हा केवळ बाह्य रूप बदलण्यापुरता मर्यादित राहत नाही. एका व्यक्तीच्या आयुष्यात होणारे मानसिक, भावनिक आणि शारीरिक बदल अत्यंत संवेदनशीलतेने या भूमिकेतून मांडण्यात आले आहेत. लिंगभेदाच्या चौकटीपलीकडे जाऊन नाती, ओळख आणि मैत्री यांचा हळवा पैलूही चित्रपटातून समोर येतो.

राजश्री देशपांडेने साकारलेल्या या भूमिकेतील सहजता प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधूनr घेत आहे. चेहऱ्यावरील हावभाव, देहबोली, आवाजातील बदल आणि व्यक्तिरेखेतील नैसर्गिकता यामुळे शैलजा ते शैलेश हा प्रवास अधिक प्रभावी बनतो. या भूमिकेसाठी राजश्रीने मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही स्तरांवर मोठी मेहनत घेतल्याचे दिसून येते. नुकताच सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात शैलजापासून शैलेशपर्यंतचा संपूर्ण बदल दाखवण्यात आला आहे. या व्हिडीओलाही प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळत आहे.

दुबईत ‘झाडाला पिकलाय आंबा’ गाण्याची क्रेझ, मराठमोळा संगीतकार सागर पाटिलने रचला इतिहास

या भूमिकेविषयी बोलताना राजश्री देशपांडे म्हणाली, “शैलजा ते शैलेश हा प्रवास माझ्यासाठी खूप आव्हानात्मक आणि तितकाच समृद्ध करणारा होता. फक्त लूक बदलणं महत्त्वाचं नव्हतं, तर त्या व्यक्तीच्या मनातील संघर्ष, स्वतःला स्वीकारण्याची प्रक्रिया आणि समाजाकडे पाहण्याचा बदलता दृष्टिकोन समजून घेणं अधिक गरजेचं होतं. प्रत्येक टप्प्यावर शैलजा बदलत जाते आणि तो बदल तिच्या वागण्यात, बोलण्यात आणि विचारांमध्येही जाणवतो.” वर्किंग आय फिल्म्स प्रस्तुत बाप्या या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर तिवारी यांनी केले असून मुक्तल तेलंग आणि समीर तिवारी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात गिरीश कुलकर्णी, राजश्री देशपांडे, देविका दफ्तरदार, श्रीकांत यादव, आर्यन मेंगजी आणि गौरी किरण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सर्वत्र प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

Web Title: Rajashri deshpande look as a shailesh in bapya marathi movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • latest movies

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.