Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rishi Manohar : मराठी चित्रपटसृष्टीचा आश्वासक नायक; ऋषी मनोहरची अभिनय क्षेत्रातील दमदार वाटचाल

Rishi Manohar : मराठी मनोरंजनविश्वातील आश्वासक चेहरा म्हणून अभिनेता Rishi Manohar सध्या चर्चेत आहे. रंगभूमीपासून सुरू झालेल्या त्याच्या प्रवासाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असून अभिनयातील सहजता आणि भूमिकांमधील वैविध्य यामुळे त्याला विशेष पसंती मिळत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 13, 2026 | 07:18 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • अभिनयातील सहजता आणि भूमिकांमधील वैविध्य प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.
  • पात्रांमध्ये पूर्णपणे समरस होण्याची त्याची क्षमता ठळकपणे समोर आली.
  • ‘कप बशी’नंतर त्याच्या कारकिर्दीला आणखी वेग मिळतो का, याकडे मनोरंजनविश्वाचे लक्ष लागले आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत सातत्याने नवे कलाकार दाखल होत असले तरी काही चेहरे आपल्या अभिनयाच्या बळावर वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरतात. अशाच नव्या पिढीतील आश्वासक कलाकारांमध्ये अभिनेता Rishi Manohar याचे नाव विशेषत्वाने घेतले जात आहे. रंगभूमीपासून सुरू झालेला त्याचा प्रवास आज मराठी मनोरंजनविश्वात लक्ष वेधून घेत असून, त्याच्या अभिनयातील सहजता आणि भूमिकांमधील वैविध्य प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.

Pranit More Controversy : ‘मला फक्त एक संधी द्या…’ प्रणितने मागितली माफी! Social Media ID ऍक्टिव्हेट होताच केली ‘ती’ पोस्ट

रंगभूमीवर अभिनयाची भक्कम पायाभरणी करत ऋषीने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. नाटकांमधील अनुभवामुळे त्याच्या अभिनयात नैसर्गिकता आणि भावनांची अचूक अभिव्यक्ती दिसून येते. त्याने विविध माध्यमांमध्ये काम करत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विशेषतः Dada, Ek Good News Aahe या नाटकातून आणि Pet Puran या लोकप्रिय वेबसिरीजमधून त्याच्या अभिनयाला मोठी दाद मिळाली. या कलाकृतींमधील त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या असून, पात्रांमध्ये पूर्णपणे समरस होण्याची त्याची क्षमता ठळकपणे समोर आली.

आजच्या स्पर्धात्मक मनोरंजन क्षेत्रात केवळ चांगला अभिनेता असणे पुरेसे नसते. प्रभावी व्यक्तिमत्त्व, पडद्यावरील उपस्थिती आणि भूमिकांमध्ये सातत्याने नवे काहीतरी देण्याची क्षमता यांचीही गरज असते. ऋषी मनोहरमध्ये ही सर्व वैशिष्ट्ये पाहायला मिळतात. त्यामुळेच मराठी चित्रपटसृष्टीत त्याच्याकडे भविष्यातील दमदार अभिनेत्याच्या नजरेने पाहिले जात आहे.

दरम्यान, येत्या १९ जून रोजी प्रदर्शित होणारा Cup Bashi हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. या चित्रपटातून तो एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार असून, त्याच्या अभिनयाची नवी बाजू पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याच्या भूमिकेबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

आपल्या अभिनय प्रवासाबद्दल बोलताना ऋषी मनोहर म्हणतो, “प्रत्येक भूमिका माझ्यासाठी केवळ एक व्यक्तिरेखा नसते, तर स्वतःला नव्याने शोधण्याची संधी असते. अभिनेता म्हणून प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं, अधिक प्रामाणिक आणि अधिक परिणामकारक साकारण्याचा माझा प्रयत्न असतो. ‘कप बशी’मधील भूमिका माझ्यासाठी विशेष ठरली आहे. या भूमिकेतून प्रेक्षकांना माझ्या अभिनयाची एक नवी बाजू अनुभवायला मिळेल आणि त्या प्रवासाशी ते मनापासून जोडले जातील, अशी मला आशा आहे.”

Amruta Khanvilkar : नाटकाने सुवर्ण अंक गाठला अन् अभिनेत्रीने नाटक सोडलं! अमृताच्या जागी ‘या’ नव्या चेहऱ्याला मिळणार संधी

मराठी चित्रपटसृष्टी नेहमीच नव्या आणि दमदार कलाकारांच्या शोधात असते. त्या शोधात ऋषी मनोहर हे नाव दिवसेंदिवस अधिक ठळक होताना दिसत आहे. रंगभूमी, वेबसिरीज आणि आता चित्रपट अशा विविध माध्यमांमधून तो आपल्या अभिनयाची छाप पाडत असून, आगामी काळात मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा चेहरा म्हणून तो समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे आणि अभिनयावरील निष्ठेमुळे प्रेक्षकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. त्यामुळे ‘कप बशी’नंतर त्याच्या कारकिर्दीला आणखी वेग मिळतो का, याकडे मनोरंजनविश्वाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Rishi manohars impressive journey in the acting world

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 07:18 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.