फोटो सौजन्य - Social Media
Bigg Boss 19th चा सेकंड रनर अप प्रणित मोरे सध्या वादात अडकला आहे. प्रणितचा ‘The Pranit More Show’ एक लोकप्रिय शो आहे, अनेकांकडून या शोला पाहिले जाते, पण याच शो दरम्यान घडलेल्या काही घटनांनी एका Controversy ला जन्म दिला आहे. यामध्ये ‘370 ची बिर्याणी’ आणि ‘सेजल पवार Controversy’ या दोन मुद्द्यांनी प्रणित मोरेच्या लोकप्रियतेवर गदा आणली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे प्रणितचे सोशल मीडिया हॅन्डल डिऍक्टिव्हेट करण्यात आले होते. काही काळाने प्रणितचे सोशल मीडिया हॅन्डल पुन्हा ऍक्टिव्हेट झाले. ऍक्टिव्हेट होताच प्रणितने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर करत त्याच्या शोमधील काही स्टेटमेंटमुळे दुखावलेल्या प्रेक्षकांची माफी मागितली आहे.
काय आहे पोस्ट?
प्रणित मोरेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्या व्हिडिओमध्ये तो म्हणतो की, “गेल्या काही काळापासून Instagram कडून माझा हॅन्डल सस्पेंड करण्यात आला होता. माझी Crowd work वाली एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यातून मला फार द्वेषही मिळत आहे आणि मी नक्कीच त्या द्वेषाच्या पात्रतेचा आहे. त्या मुलासोबत चर्चा करताना त्याने ज्या गोष्टी सांगितल्या त्यावर सगळे हसू लागले आणि ओघात मीही हसलो, जी माझी फार मोठी चूक ठरली. मी त्या व्यक्तीला तेव्हाही रोखू शकलो असतो पण मी त्यावेळी तसं काहीच केलं नाही. उलट, त्याला मी असे विधाने करण्यासाठी एक मंच दिला. त्यामुळे त्या विधानांमुळे ज्याकुणाची मन दुखावली असतील त्या सगळ्यांची मी माफी मागू इच्छितो. ज्या न्यायालयीन गोष्टी माझ्यासोबत आता होत आहेत, त्या सगळ्या गोष्टीशी मी Corporate करत आहे. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतोय की मला एक संधी द्या, जेणेकरून मी माझ्यात सुधार करू शकेल आणि एक चांगला व्यक्ती बनू शकेल.”
काय आहे मुद्दा!
प्रणितच्या एका शोमध्ये हिमांशू जांगरा या व्यक्तीने त्याच्या Dating अनुभवाबद्दल सांगितले. तो म्हणाला की, त्याने त्याच्या Girlfriend साठी 370 रुपयांची बिर्याणी आणली पण ती त्याने वसूल केली नाही किंवा त्या मुलीने त्याला ती बिर्याणी वसूल करून दिली नाही. एकंदरीत, “एका मुलीला बिर्याणी आणून देणे हा त्या मुलीचा Consant होतो का?” असा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे प्रणित मोरे शोबद्दल देशात वातवरण तापलं. त्यात मुंबईची मेडिकल विद्यार्थिनी सेजल पवारने प्रणितच्या एका शोमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये मृतशवावर अभ्यास करण्यासंबंधित एक अश्लील टिप्पणी केली, ज्यामुळे वाद आनखीन तीव्र झाला.






