Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 30 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सैराट फेम अरबाज शेखच्या वडिलांचे निधन! तीन आठवड्यांपूर्वीच अभिनेत्याने शेअर केला होता भावूक व्हिडीओ

Aslam Shaikh Passed Away : 'सैराट' फेम अभिनेता अरबाज शेख यांचे वडील अस्लम शेख यांचे गुरुवारी निधन झाले. ब्रेन हॅमरेजमुळे गेल्या महिनाभरापासून सोलापूरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 30, 2026 | 08:14 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

Aslam Shaikh Passed Away : ‘सैराट’ चित्रपटातून घराघरात पोहोचलेले अभिनेता अरबाज शेख यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे वडील अस्लम शेख यांचे गुरुवारी निधन झाले. ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर गेल्या महिनाभरापासून सोलापूरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांची प्रकृती सुधारू शकली नाही आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Spider Man Movie Review : टॉम हॉलंडचा ‘स्पायडर-मॅन’ ठरला सुपरहिट? सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रिया

अस्लम शेख यांच्या प्रकृतीबाबत तीन आठवड्यांपूर्वी अरबाज शेख यांनी सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत त्यांनी वडिलांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. त्याचबरोबर उपचारादरम्यान आलेल्या अडचणींचा उल्लेख करत सोलापूरातील नोबेल हॉस्पिटलच्या कथित कारभारावरही प्रश्न उपस्थित केले होते.

या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) संबंधित मेडिकल दुकानांवर कारवाई केली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत आवश्यक मदतीचे निर्देश दिले होते. त्यानंतर डॉ. अश्विन वळसंगकर यांनी पुढाकार घेत उपचारासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते.

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या जोडीचा नवा चित्रपट ‘मूर्ती’! वेगळ्या विषयाची प्रभावी सिनेमॅटिक मांडणी

दरम्यान, वडिलांना वाचवण्यासाठी अरबाज शेख सातत्याने प्रयत्नशील होते. आर्थिक मदतीपासून ते वैद्यकीय उपचारांपर्यंत त्यांनी अनेक स्तरांवर धावपळ केली. मात्र अखेर अस्लम शेख यांची जीवनाशी सुरू असलेली लढाई संपुष्टात आली. अस्लम शेख यांच्या निधनामुळे शेख कुटुंबावर शोककळा पसरली असून, सोशल मीडियावर चाहते आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

Web Title: Sairat fame abaz shaikhs father aslam shaikh passed away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 08:14 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.