Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saleel Kulkarni : शांताबाईंनी स्वतः लिहलेली कविता आणि तो कागद… सलील कुलकर्णींच्या जुन्या पण ताज्या आठवणी!

संगीतकार आणि गायक सलील कुलकर्णी यांनी नुकतीच त्यांच्या सोशल मीडियावर एक खास आठवण शेअर केली असून ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यांनी ज्येष्ठ कवयित्री आणि गीतकार शांताबाई शेळके यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून दिलेल्या कवितेचा फोटो पोस्ट केला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 06, 2026 | 06:26 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
  • याची संपूर्ण माहिती स्वतः सलील यांनी पोस्टखाली कॅप्शन देत सांगितली आहे.
  • शांताबाई शेळकेंची ती कविता :
संगीतकार आणि गायक सलील कुलकर्णी नेहमीच त्यांच्या गाण्यामुळे चर्चेत असतात. मराठी सिनेसृष्टीत त्यांचे योगदान अफाट आहे. सलील कुलकर्णी यांचे अनेक थोर मराठी कवी तसेच गीतकरांशी जुने संबंध आहेत तसेच सोबत कामेही केली आहेत. याचाच एक नमुना सलील कुलकर्णी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

Neha Kakkar Birthday: आर्थिक तंगी, 4 वर्ष गात राहिली भजन; शो मधून बाहेर पण झाली त्याच शो ची परीक्षक, नेहा कक्करचा प्रवास

काय केलं पोस्ट?

सलील कुलकर्णी यांनी केलेल्या पोस्टमध्ये सुप्रसिद्ध मराठी कवियत्री आणि गीतकार शांताबाई शेळके यांच्या कवितेचा फोटो आहे. या सुंदर ओळी स्वतः शांताबाईंनी लिहल्या आहेत. त्या कशा लिहल्या गेल्या? याची संपूर्ण माहिती स्वतः सलील यांनी पोस्टखाली कॅप्शन देत सांगितली आहे.

त्यांनी नमूद केले आहे की, “१९९८ साली ज्येष्ठ कवयित्री आणि गीतकार शांताबाई शेळके यांनी मला स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून दिलेल्या गाण्याचा हा कागद नुकताच पुन्हा सापडला. काहीतरी वेगळे शोधताना जुन्या फाईलमधील जपून ठेवलेल्या कागदांमध्ये तो अचानक समोर आला आणि अनेक आठवणी जाग्या झाल्या. आजच्या काळात आपण PDF, इमेज किंवा टाइप केलेला मजकूर सहज पाठवतो; पण अशा हस्तलिखित कागदाचा स्पर्श म्हणजे त्या व्यक्तीच्या हाताचा स्पर्श पुन्हा अनुभवण्यासारखा वाटतो. सातारा रोडवरील त्यांच्या घरी त्यांना अनेकदा निवांत भेटण्याचा योग आला होता. एकदा तर त्या आमच्या घरी विकेंडसाठीही राहायला आल्या होत्या. त्यांच्याच एका भेटीत त्यांनी माझी ओळख अरुणा ढेरे यांच्याशी करून दिली होती. विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर यांच्या कवितांवर मी केलेली बालगीतेही त्यांनी आवर्जून ऐकली होती. शांताबाई कधीच ‘महान कवयित्री’ किंवा ‘प्रसिद्ध गीतकार’ या भूमिकेत वावरल्या नाहीत. त्या नेहमी एका बुद्धिमान, निरागस आणि प्रेमळ आजीसारख्याच भेटायच्या. मात्र लेखणी हातात घेताच जणू सरस्वतीच अवतरायची. त्यामुळे त्या वेळी अवघ्या पंचविशीत असलेल्या माझ्यावर त्यांचे नातवासारखे प्रेम होते. त्या प्रसिद्धीच्या उंच शिड्या उतरून लहानांशी गप्पा मारण्यासाठी सहज खाली यायच्या आणि म्हणूनच त्या अधिक मोठ्या वाटायच्या. एकदा मी त्यांना भेटायला जाताना बटाटेवडे घेऊन गेलो होतो. गप्पा मारताना बालगीतांचा विषय निघाला. मी संकोचत विचारले, “तुमच्या पुस्तकातील एखादी कविता पुढच्या कॅसेटसाठी घेऊ का?” त्यावर त्या क्षणाचाही विलंब न करता म्हणाल्या, “अरे, मी अजून जिवंत आहे ना! नवीन लिहिते की!” मी अवाक् होऊन त्यांच्याकडे पाहत राहिलो. त्यांनी हसत मला वडा घेण्यास सांगितले. मी म्हणालो, “उद्या कार्यक्रम आहे, मी नाही खात.” त्या काळी आवाज जपणे म्हणजेच गाणे जपणे असे वाटायचे. माझे उत्तर ऐकताच त्या म्हणाल्या, “असं? यावरच एक गाणं लिहिते. मुलांना नक्की आवडेल!” आणि पुढच्या अवघ्या पंधरा मिनिटांत हा कागद माझ्या हातात होता. शब्दांवर कोणतीही ओढाताण नव्हती, यमकांसाठी धडपड नव्हती. त्या शब्द शोधत नसत, त्या शब्द निवडत असत. आजही शांताबाई शेळके आणि सुधीर मोघे खूप आठवतात. तो साधा, निरागस आणि माणुसकीने भरलेला काळ खूप आठवतो. हा कागद हातात घेतला की वाटते, जणू शांताबाईंनी पुन्हा एकदा प्रेमाने डोक्यावरून हात फिरवला आहे. – सलील कुलकर्णी”

Deool Band 2: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘देऊळ बंद २’ च्या संपूर्ण टीमचे कौतुक! ठरला सुपरहिट

शांताबाई शेळकेंची ती कविता :

कोकीळ म्हणते ‘काय करावे’?
खोकून बसला पार घसा,
कुहूकुहूचे सुंदर गाणे,
सांगा आता गाऊ कसा?

कुत्रा म्हणतो ‘उडी मारुनी,
पकडू गेलो एक ससा’
ससा पळाला, पाय मोडला,
चोरामागे धावू कसा!

म्हणे कोंबडा TV बघता,
रात्री गेला वेळ असा
उशिरा उठलो, कुकडुकुची
हाक कुणा मी देऊ कसा?

बोका म्हणतो ‘चष्म्यावाचून
आंधळाच मी भर दिवसा’,
बिळात सर्रकन पळून गेला
उंदीर कोठे, मी पाहू कसा?

– शांताबाई शेळके

Web Title: Saleel kulkarni shared memories of poet shantabai shelke

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 06:26 PM

Topics:  

  • saleel kulkarni

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.