Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तिघी’च्या वर्ल्ड डिजिटल प्रीमियरची घोषणा! ZEE 5 ने अखेर जाहीर केली तारीख; ‘या’ दिवशी येणार चित्रपट

ZEE5 वर १५ मे २०२६ रोजी तिघी चा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार असून, चित्रपटगृहांमध्ये मिळालेल्या दमदार प्रतिसादानंतर ही भावनिक मराठी कलाकृती आता डिजिटल माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 08, 2026 | 09:01 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • मराठी कलाकृती डिजिटल माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
  • चित्रपटात निपुण धर्माधिकारी, सुव्रत जोशी, मृण्मयी गोडबोले आणि संजय मोने यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
  • जीजिवीशा काळे यांच्या दिग्दर्शनातील हा पहिलाच चित्रपट असून…
ZEE5 वर १५ मे २०२६ रोजी तिघी चा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटगृहांमध्ये समीक्षक आणि प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ही भावनिक मराठी कलाकृती डिजिटल माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुप्री अॅडव्हर्टायझिंग अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड निर्मित आणि जीजिवीशा काळे यांच्या दिग्दर्शनातील हा पहिलाच चित्रपट असून, कौटुंबिक नात्यांतील शांतता, न बोललेली सत्ये आणि भावनिक गुंतागुंत यांवर आधारित असलेली ही कथा प्रेक्षकांना अंतर्मुख करणारी ठरत आहे.

Apurva Nemlekar : अभिनेत्री घेऊन येतेय नवी मालिका! ‘ती येतेय…’ AI Micro Drama Padmini

तिघी मध्ये नेहा पेंडसे, भारती आचरेकर आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. स्वाती, हेमलता आणि सारिका या तीन महिलांच्या नात्यांभोवती फिरणारी ही कथा भावनिक संघर्ष, अपराधीपणा आणि कुटुंबातील ताणतणाव यांचा संवेदनशील शोध घेते. चित्रपटात निपुण धर्माधिकारी, सुव्रत जोशी, मृण्मयी गोडबोले आणि संजय मोने यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

ZEE5 मराठीच्या बिझनेस हेड हेमा व्ही. आर. यांनी सांगितले की, मानवी भावना आणि नातेसंबंधांवर आधारित कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा ZEE5 चा प्रयत्न कायम आहे आणि ‘तिघी’ ही त्याच दिशेने एक महत्त्वाची कलाकृती आहे. दिग्दर्शिका जीजिवीशा काळे यांनीही ही कथा वैयक्तिक अनुभवांशी जोडलेली असल्याचे सांगत, आता ती अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार असल्याचा आनंद व्यक्त केला.

Zee Marathi : ‘चिकी चिकी बुबुम बूम’ गाण्यावर थिरकलं मेहेंदळे कुटुंब; ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचे 500 भाग पूर्ण

नेहा पेंडसे हिने स्वाती हे पात्र भावनिकदृष्ट्या गुंतागुंतीचे असल्याचे सांगितले, तर सोनाली कुलकर्णी हिने ‘तिघी’ ही कथा प्रत्येकाला स्वतःशी जोडलेली वाटेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. कौटुंबिक नात्यांतील भावनिक वास्तव मांडणारा हा चित्रपट आता १५ मे २०२६ पासून ZEE5 मराठीवर पाहता येणार आहे.

Web Title: Tighi world digital premiere announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 09:01 PM

Topics:  

  • Entertainmenmt
  • sonali kulkarni

संबंधित बातम्या

Vishakha Subhedar On Maharashtrachi Hasyajatra: विशाखा सुभेदारने हास्यजत्रा का सोडली? अखेर सांगितलं खरं कारण
1

Vishakha Subhedar On Maharashtrachi Hasyajatra: विशाखा सुभेदारने हास्यजत्रा का सोडली? अखेर सांगितलं खरं कारण

Shubham Karoti Marathi Play: मुलांची स्वप्नं की आई-बाबांच्या अपेक्षा? ‘शुभं करोति’मधून उलगडणार घराघरातली गोष्ट
2

Shubham Karoti Marathi Play: मुलांची स्वप्नं की आई-बाबांच्या अपेक्षा? ‘शुभं करोति’मधून उलगडणार घराघरातली गोष्ट

Athiya Shetty: ‘कम ओव्हर टू द ग्रीनर साइड’! अथिया शेट्टीसोबत प्राइड ऑफ काऊजची खास जाहिरात
3

Athiya Shetty: ‘कम ओव्हर टू द ग्रीनर साइड’! अथिया शेट्टीसोबत प्राइड ऑफ काऊजची खास जाहिरात

Ketaki Mategaonkar: आवाजाची जादू अन् चाहत्यांचं भरभरून प्रेम! ‘या’ अभिनेत्रींने पार केला ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा
4

Ketaki Mategaonkar: आवाजाची जादू अन् चाहत्यांचं भरभरून प्रेम! ‘या’ अभिनेत्रींने पार केला ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.