'चिकी चिकी बुबुम बूम' गाण्यावर थिरकलं मेहेंदळे कुटुंब; 'सावळ्याची जणू सावली' मालिकेचे 500 भाग पूर्ण
मालिकेचा 500 भागांचा टप्पा पूर्ण झाल्य़ाबाबत पार्टी करत असताना निर्माते आणि कलाकारांची संपूर्ण टीम धमाल करत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर गाजत आहेत. व्हिडीओमध्ये मालिकेतील कलाकार आणि महेश कोठारे केक कापताना दिसत आहेत. त्यावेळी महेश कोठारे यांचं ‘चिकी चिकी बुबुम बूम’ या गाण्यावर कलाकरांनी चांगलाच ठेका पकडला.
दरम्यान सावळ्याची जणू सावली मालिकेत आता नवनवीन वळणं पाहायला मिळत आहे. मालिकेत सारंग आणि सावलीला दोन मुलं झाली पण आई बाबांचं प्रेम यांच्या मुलांना मिळत नाही. सारंग आणि सावलीचा मुलगा अबीर हा सावलीकडे तर मुलगी सारंगकडे राहते. मात्र आपण जिला दत्तक घेतलं ती मुलगी खरंच आपलीच आहे हे सारंगला अजूनही माहित नाही. तर दुसरीकडे सावली आणि अबीर एकत्र राहतात. सावलीने ती कुठे राहते काय करते याला कोणालाही ठाव ठिकाणा लागू दिलेला नाही. याच कारण म्हणजे सावली गरोदर असताना राजकुमारने तिच्या दोन्ही बाळांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला. त्या सगळ्या संकटातून विठ्ठलाच्या कृपेने सावली वाचते. त्यानंतर सावली कोणाला ही न सांगता तिच्या मुलाबरोबर मेहेंदळे कुटुंबापासून दूर राहते.
Apurva Nemlekar : अभिनेत्री घेऊन येतेय नवी मालिका! ‘ती येतेय…’ AI Micro Drama Padmini
काही दिवसांपूर्वीच्या भागात असं दाखवण्यात आलं होतं की सावलीला तिचे मानलेले बाबा म्हणजे जगन्नाथ भेटतात. त्यांना पाहून सावलीला खूप आनंद देखील होतो. सारंग आणि सावली एकत्र येणार की, राजकुमार,तिलोत्तमा आणि भेैरवी यांचा डाव यशस्वी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
“माझे वडील पोलिस आहेत “ वडिलांच्या निवृत्तीनिमित्ताने ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची खास पोस्ट






