Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tumbadchi Manjula : बॉक्स ऑफिसवर फक्त मंजुळाची हवा! 15 दिवसांची कमाई बघाच, सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर

‘तुंबाडची मंजुळा’ने अवघ्या दोन आठवड्यांत १५ कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा पार करत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी नोंदवली आहे. राज्यभरातील अनेक चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुलचे फलक झळकत असून, सोशल मीडियावरही चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 20, 2026 | 04:59 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावरही चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
  • काही प्रेक्षकांनी दुसऱ्यांदा थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहिल्याचेही सांगितले आहे.
  • पुढील काही दिवसांत त्याची कमाई आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली असून, अवघ्या दोन आठवड्यांत चित्रपटाने १५ कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा गाठला आहे. झी स्टुडिओजच्या निर्मितीतील आणि विविध कोरगांवकर यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या चित्रपटाला राज्यभरातील प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी चित्रपटगृहांबाहेर हाऊसफुलचे फलक झळकत असून, सोशल मीडियावरही चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

World Music Day : ‘सावली’मुळे संगीताशी आणखी घट्ट नातं जडलं; प्राप्ती रेडकरचा खास अनुभव

उत्कंठावर्धक कथानक, हलकाफुलका विनोद, मधुर संगीत आणि कोकणातील निसर्गरम्य दृश्यांमुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. कुटुंबासह पाहण्यासारखा चित्रपट असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांकडून व्यक्त होत असून, काही प्रेक्षकांनी दुसऱ्यांदा थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहिल्याचेही सांगितले आहे.

चित्रपटाच्या यशाबद्दल झी स्टुडिओज मराठीचे व्यवसायप्रमुख तथा निर्माते बवेश जानवलेकर यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, २०२६ हे वर्ष झी स्टुडिओजसाठी उल्लेखनीय ठरत असून, याआधी प्रदर्शित झालेल्या ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई’ आणि ‘सुपर डुपर’प्रमाणेच ‘तुंबाडची मंजुळा’लाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

त्यांच्या मते, या चित्रपटाचे यश केवळ कमाईच्या आकड्यांपुरते मर्यादित नाही. महिलांवरील अत्याचारासारख्या संवेदनशील सामाजिक विषयाला स्पर्श करत हा चित्रपट प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो. मनोरंजनासोबतच महत्त्वाचा संदेश देण्यात चित्रपट यशस्वी ठरल्याचे त्यांनी नमूद केले.

Cocktail 2 : सिनेमाला अडल्ट सर्टिफिकेट, शाहिद कपूर भडकला! Censor Board च्या निर्णयाने अभिनेता नाराज

जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, अंशुमन विचारे, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे, उषा नाडकर्णी यांच्यासह अनेक कलाकारांच्या प्रभावी अभिनयामुळे ‘तुंबाडची मंजुळा’ला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. दोन आठवड्यांत १५ कोटींचा टप्पा पार करत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपला ठसा उमटवला असून, पुढील काही दिवसांत त्याची कमाई आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Tumbadchi manjula 15 days box office collection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • latest movies
  • Om Bhutkar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.