
फोटो सौजन्य - Social Media
या चित्रपटातून पुन्हा एकदा Vaibhav Tatwawadi आणि Pooja Sawant ही लोकप्रिय जोडी एकत्र झळकणार आहे. पहिल्या भागातील दोघांची केमिस्ट्री, त्यांचा सहज अभिनय आणि भावनिक प्रेमकथेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यामुळे सिक्वेलमध्येही हीच जोडी कायम ठेवण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. या घोषणेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून सकारात्मक प्रतिक्रिया उमटत असून, अनेकांनी चित्रपटाबाबतची उत्सुकता व्यक्त केली आहे.
‘स्वरूप स्टुडिओज’च्या बॅनरखाली प्रभाकर परब, सचिन नारकर आणि विकास पवार या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. पहिल्या भागाचे दिग्दर्शक Chandrakant Kanse हेच सिक्वेलचेही दिग्दर्शन करणार आहेत. तर चित्रपटाचे लेखन आणि पटकथा संजय जमखंडी यांनी केली आहे. पहिल्या भागाचा भावनिक गाभा कायम ठेवत नव्या कथानकातून प्रेक्षकांना वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे निर्मिती संस्थेकडून सांगण्यात आले आहे.
सिक्वेलबाबत बोलताना दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांनी सांगितले की, “‘भेटली तू पुन्हा’च्या पहिल्या भागाला हलकी-फुलकी प्रेमकथा, सुमधुर संगीत आणि कलाकारांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. त्या प्रेमामुळेच दुसरा भाग घेऊन येण्याचे धाडस आम्ही केले आहे. या वेळी कथानक अधिक परिपक्व असेल. पात्रांच्या आयुष्यात काळानुसार झालेले बदल, त्यांचे नाते आणि त्यातून निर्माण होणारे भावनिक संघर्ष प्रेक्षकांना पाहायला मिळतील. त्यामुळे हा चित्रपट केवळ सिक्वेल नसेल, तर पहिल्या भागाची भावनिक पुढची पायरी असेल.”
देव आनंद यांचे चिरंजीव सुनील आनंद यांना देवाज्ञा! जिथे वडिलांनी प्राण सोडले, तिथेच प्राणज्योत माळवली
निर्मात्यांच्या मते, ‘भेटली तू पुन्हा २’मध्ये प्रेमकथेचा आत्मा कायम ठेवत नव्या पिढीशी जोडणारी कथा मांडण्यात येणार आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला डिसेंबरमध्ये सुरुवात होणार असून, त्यानंतर पोस्ट-प्रॉडक्शनची कामे पूर्ण करून २०२७ मध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याचे नियोजन आहे. पहिल्या भागाप्रमाणेच या चित्रपटातील संगीतावरही विशेष भर दिला जाणार असून, लवकरच कलाकार आणि इतर तांत्रिक बाबींविषयी अधिकृत माहिती जाहीर केली जाणार आहे. ‘भेटली तू पुन्हा २’च्या घोषणेमुळे मराठी चित्रपटप्रेमींमध्ये नव्या प्रेमकथेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.