Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अगं आई अहो आई’ मधील भूमिकेला हृताने का दिला होकार? अभिनेत्रीने सांगितलं खास कारण

मराठी अभिनेत्री हृता दुर्गुळे झी ५ मराठीवरील 'अगं अगं अहो आई' या वेब सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत ती 'श्रेया' ही भूमिका साकारत असून, रेणुका शहाणे आणि निर्मिती सावंत यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळेच तिने या प्रकल्पाला होकार दिल्याचं सांगितलं.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 29, 2026 | 03:27 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • अनेक महत्त्वाचे प्रसंग प्रत्येकालाच कुठे ना कुठे स्वतःशी जोडलेले वाटतील, असंही तिने सांगितलं.
  • दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांच्या कामाचं कौतुक केलं.
  • वेब सिरीज प्रेक्षकांना झी ५ मराठीवर पाहायला मिळणार आहे.
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे लवकरच झी ५ मराठीवरील ‘अगं अगं अहो आई’ या वेब सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत ती ‘श्रेया’ ही भूमिका साकारत असून, तिच्यासोबत रेणुका शहाणे आणि निर्मिती सावंत यांसारख्या दिग्गज अभिनेत्रींची साथ लाभली आहे. या भूमिकेला होकार देण्यामागचं खास कारण हृताने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. हृता म्हणाली, “‘अगं अगं अहो आई’मध्ये मी श्रेयाची भूमिका साकारतेय. रेणुका ताई माझ्या आईच्या भूमिकेत आहेत, तर निर्मिती ताई माझ्या सासूची भूमिका साकारत आहेत. त्यामुळे खरं सांगायचं तर या मालिकेला नाही म्हणण्याचं काहीच कारण नव्हतं.” या मालिकेची कथा नव्याने लग्न झालेल्या मुलीच्या आयुष्यातील पहिल्या वर्षाभोवती फिरते. त्या काळात घडणारे अनेक महत्त्वाचे प्रसंग प्रत्येकालाच कुठे ना कुठे स्वतःशी जोडलेले वाटतील, असंही तिने सांगितलं.

Rakhi Sawant On Kangana Ranaut: ‘कंगना रणौतचं तोंड घाणेरडं; पुन्हा चापट बसेल!’ राखी सावंतचा संताप, चारित्र्यावरही साधला निशाणा

पुढे बोलताना हृताने लेखिका कल्याणी पंडित आणि दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांच्या कामाचं कौतुक केलं. “या मालिकेचा लुक, फील आणि एकूणच टोन खूप नैसर्गिक आहे. नव्या घरात जाण्याची धाकधूक, नव्या नात्यांशी जुळवून घेणं आणि दोन्ही बाजूंनी होणारे प्रयत्न हे सगळंच खूप खरं आणि जवळचं वाटतं. त्यामुळे श्रेयाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे,” असं ती म्हणाली.

लग्नानंतर श्रेयाची व्यक्तिरेखा पुण्याहून कोल्हापूरला येते. हा प्रवास आजच्या तरुणींना किती जवळचा वाटेल, याबद्दल विचारलं असता हृता म्हणाली, “आम्ही या मालिकेतून कोणालाही काही शिकवण्याचा किंवा उपदेश करण्याचा प्रयत्न केलेला नाही. ही मुख्यतः श्रेया, तिची आई आणि तिची सासू यांच्या नात्यांची गोष्ट आहे. त्यांचा प्रवास प्रामाणिक आणि रिलेटेबल आहे. त्यामुळे यातून काही शिकण्यापेक्षा प्रेक्षकांनी त्यांचा हा प्रवास अनुभवावा आणि एन्जॉय करावा, एवढंच मला वाटतं.”

Mukkam Post Pandharpur: आषाढी एकादशीनिमित्त ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ची घोषणा; विठ्ठलभक्ती आणि आत्मशोधाचा भावस्पर्शी प्रवास

सासू-सुनेच्या नात्याबद्दलचे ठरलेले समज आणि साचेबद्ध प्रतिमांबाबतही हृताने आपलं मत स्पष्ट केलं. “प्रत्येक नातं सारखंच असतं असं नाही. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. आज अनेक घरांमध्ये सून ही कुटुंबाचा समान सदस्य म्हणून स्वीकारली जाते. तिच्या विचारांना, मतांना आणि व्यक्तिमत्त्वाला तितकाच आदर दिला जातो. ही समानता आणि परस्परांचा आदर प्रत्येकाच्या वैयक्तिक विकासासाठीही खूप महत्त्वाचा आहे,” असं ती म्हणाली. कौटुंबिक नात्यांमधील भावनिक गुंतागुंत, नव्या नात्यांशी जुळवून घेण्याचा प्रवास आणि आई-सासू-सुनेतील नात्याचा वेगळा पैलू उलगडणारी ‘अगं अगं अहो आई’ ही वेब सिरीज प्रेक्षकांना झी ५ मराठीवर पाहायला मिळणार आहे.

Web Title: Why did hruta agree to the role in aga aai aho aai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • marathi zee5
  • zee5

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.