Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

15 वर्षांनंतर पुन्हा रंगणार सासू-सुनेची जुगलबंदी; ‘पुढचं पाऊल’ची जोडी रंगभूमीवर एकत्र

‘पुढचं पाऊल’ मालिकेतील लोकप्रिय सासू-सुनेची जोडी तब्बल 15 वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हर्षदा खानविलकर आणि शर्मिला राजाराम शिंदे या ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ या नव्या नाटकात दिसणार आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 12, 2026 | 06:22 PM
15 वर्षांनंतर पुन्हा रंगणार सासू-सुनेची जुगलबंदी; ‘पुढचं पाऊल’ची जोडी रंगभूमीवर एकत्र

15 वर्षांनंतर पुन्हा रंगणार सासू-सुनेची जुगलबंदी; ‘पुढचं पाऊल’ची जोडी रंगभूमीवर एकत्र

Follow Us
Close
Follow Us:

मराठी रंगभूमी आणि छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांसाठी एक खास आनंदाची बातमी समोर आली आहे. तब्बल १५ वर्षांनंतर लोकप्रिय सासू-सुनेची जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार असून, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. Pudhcha Paul या गाजलेल्या मालिकेत आपल्या अभिनयाने घराघरात पोहोचलेल्या हर्षदा खानविलकर आणि शर्मिला राजाराम शिंदे या अभिनेत्री आता रंगभूमीवर पुन्हा एकत्र दिसणार आहेत.

तब्बल १५ वर्षानंतर छोट्या पडद्यावरची सासु-सुनेची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पुढचं पाऊल’ या गाजलेल्या मालिकेतील शिस्तप्रिय आणि खाष्ट सासू हर्षदा खानविलकर तिच्या ऑनस्क्रीन कट कारस्थानी सुनेसोबत म्हणजेच शर्मिला राजाराम शिंदेसोबत रंगमंचावर पुन्हा एकदा एन्ट्री घेत आहे. या ऑनस्क्रीन सासु-सुनेची जुगलबंदी पुन्हा एकदा सासू सूनेच्याच भूमिकांमध्ये ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ या नाटकाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

या नाटकाच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या दोन्ही अभिनेत्रींनी ती केमिस्ट्री पुन्हा एकदा जिवंत करणार असल्याचे सांगितले. अभिनेत्री हर्षदा खानविलकर म्हणाल्या, “शर्मिष्ठा अत्यंत प्रामाणिक कलाकार आहे. ती अत्यंत गुणी तर आहेच. ‘पुढचं पाऊल’च्या सेटवर आम्ही मनापासून कामही केले आणि धमाल, मस्तीही केली. या नाटकाच्या निमित्ताने आम्हाला पुन्हा एकदा ती केमिस्ट्री प्रेक्षकांसमोर आणायची आहे.”

Abhang Tukaram : टाळ-मृदंगाच्या गजरात आता OTTवर तुकोबांची गाथा, ‘अभंग तुकाराम’चा दमदार ट्रेलर रिलीज!

शर्मिला राजाराम शिंदे म्हणते, “तब्बल १५ वर्षानंतर आम्ही एकत्र येतो आहे. अर्थात मजा तर येतच आहे पण हर्षदा ताईंकडून पुन्हा एकदा शिकायला मिळणार याचा आनंद जास्त आहे. यावेळी सासू सुनेच्याच भूमिकेत परंतु नवीन ढंगात आम्ही प्रेक्षकांसमोर येत आहोत. सोनल प्रॉडक्शन्स निर्मित आणि प्रिया बापट प्रस्तुत या नाटकात सुनील बर्वे, हर्षदा खानविलकर, अक्षर कोठारी, शर्मिला राजाराम शिंदे, शंतनू ठवळी आणि वैष्णवी आंबवणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नाटकाचे लेखन अमोल पाटील यांनी केले असून दिग्दर्शनाची धुरा अद्वैत दादरकर यांनी सांभाळली आहे.येत्या ९ मे पासून हे नाटक रंगभूमीवर नाट्यरसिकांच्या भेटीस येणार आहे.

या नाटकाचा ट्रेलरही अत्यंत वेगळ्या पद्धतीने सादर झाला. यावेळी या दोघींसोबत इतरही कलाकारांची जुगलबंदी पाहायला मिळाली. आता ही सासु-सुनेची जोडी सहकलाकारांसोबत काय जादू करते, याकडे प्रेक्षकवर्गाचं आणि चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

Satrangi – Badle Ka Khel : ‘सतरंगी – बदले का खेल’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; सूड, सत्ता आणि दुहेरी आयुष्याची थरारक कथा

Web Title: Pudhcha paul saasu sune jodi reunion new marathi play

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 06:22 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.