Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samir Choughule : अभिनेत्री शलाका पवारने व्यक्त केल्या भावना! म्हणाली ‘माझ्यामुळे समीरचं नुकसान…’

अभिनेत्री शलाका पवारने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेता समीर चौगुलेबद्दल मनमोकळ्या भावना व्यक्त केल्या. 'फू बाई फू'मधील त्यांच्या जोडीच्या आठवणी सांगताना ती काहीशी भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर "माझ्यामुळे समीरचं नुकसान झालं" असं त्या वेळी वाटल्याची कबुली तिने दिली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 07, 2026 | 07:18 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शलाका पवारने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. ‘मर्डर मेस्त्री’, ‘ऑल मोस्ट सुफळ संपूर्ण’, ‘इरादा पक्का’, ‘गोठ’, ‘तू चांदणे शिंपीत जाशी’ आणि ‘का रे दुरावा’ यांसारख्या गाजलेल्या कलाकृतींमध्ये तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शलाकाने तिच्या सहकलाकारांबद्दल, मैत्रीबद्दल आणि अभिनेता समीर चौगुलेसोबतच्या जुन्या आठवणींबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला.

Sushma Murudkar : जेव्हा मराठी अभिनेत्रीला हिंदी क्षेत्रात भाषेवरून हिणवलं जातं; 200 लोकांसमोर केला अपमान,’तुझी गावठी मराठी…’

मुलाखतीत शलाका म्हणाली की, नाटकाच्या क्षेत्रात काम करताना जुळलेली नाती आजही तितकीच घट्ट आहेत. “आमच्या ‘यदा कदाचित’ नाटकातील कलाकारांशी रोज संपर्क होत नाही. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असतो. मात्र, जेव्हा भेट होते तेव्हा जुनाच जिव्हाळा आणि आपुलकी जाणवते. राकेश जाधव, पौर्णिमा अहिरे, सीमा रेणके, सागर कारंडे आणि इतर अनेक कलाकारांशी आजही चांगले संबंध आहेत,” असे तिने सांगितले.  याचवेळी तिने अभिनेत्री किशोरी अंबिये यांच्याबद्दल विशेष भावना व्यक्त केल्या. “किशोरी अंबिये माझ्यापेक्षा खूप सीनियर आहेत. पण त्यांनी मला नेहमीच भरभरून प्रेम दिलं. त्या माझ्या कुटुंबातील सदस्य असल्यासारख्या आहेत. मी त्यांना माझ्या नणंदेसारखं मानते,” असे शलाका म्हणाली.

मुलाखतीदरम्यान तिला समीर चौगुलेबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. विशेषतः ‘फू बाई फू’मधील त्यांच्या लोकप्रिय जोडीबद्दल आणि आज समीरला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये पाहताना काय वाटतं, याबद्दल विचारण्यात आले. त्यावर शलाका म्हणाली, “समीर माझा खूप चांगला मित्र आहे. आज आमचा पूर्वीसारखा सतत संपर्क नसला तरी एकमेकांबद्दलचा जिव्हाळा कायम आहे. त्याची पत्नी कविता हिच्यासोबतही माझी खूप चांगली मैत्री आहे.”

समीरच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलताना ती म्हणाली, “तो मला माणूस म्हणून खूप आवडतो. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केलं आहे. त्याच्यासोबत काम करताना खूप सुंदर आठवणी तयार झाल्या. आज तो ज्या उंचीवर पोहोचला आहे, ते पाहून खूप अभिमान वाटतो.” समीरच्या यशाबद्दल बोलताना शलाका म्हणाली, “आज समीर एक मोठा कलाकार म्हणून ओळखला जातो. त्याचे एकपात्री प्रयोग प्रचंड लोकप्रिय आहेत. परदेशातही त्याला भरभरून प्रतिसाद मिळतो. माझे नातेवाईकही मला म्हणतात की, ‘समीर तुमच्याकडे यायचा, आज तो किती मोठा झाला आहे.’ हे ऐकून खूप आनंद होतो. त्याचं यश पाहून मला मनापासून समाधान वाटतं.”

यावेळी तिने ‘फू बाई फू’ कार्यक्रमातील एक आठवणही सांगितली. ती म्हणाली, “त्या काळात मला स्पर्धात्मक कार्यक्रमांची फारशी सवय नव्हती. मी अनेकदा घाबरायचे. मला हे जमत नाही, असं म्हणत असायचे. पण समीर नेहमी माझा आत्मविश्वास वाढवायचा. तो मला प्रोत्साहन द्यायचा आणि चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा द्यायचा.” शलाका पुढे म्हणाली, “एकदा आम्ही स्पर्धेतून बाहेर पडलो. त्यावेळी मला खूप वाईट वाटलं. मला असं वाटलं की माझ्यामुळे समीरचं नुकसान झालं. मी त्याची पार्टनर नसते तर कदाचित तो आणखी पुढे गेला असता. पण समीरने कधीही तसं वाटू दिलं नाही. तो नेहमी म्हणायचा की, ‘तू खूप छान काम केलंस.’ त्याची पत्नी कवितानेही मला समजावलं.”

Jahnavi Killekar : ओम यादवसोबत केले देवदर्शन! ‘तुम्ही लग्न करा’, ‘जोडी छान दिसते…’ कमेंट्स पाहून तापला अभिनेता

ती पुढे म्हणाली, “मला माहीत होतं की समीरमध्ये खूप क्षमता आहे. त्याच्यात स्पर्धा जिंकण्याची जिद्द होती. त्याला स्वतःला सिद्ध करायचं होतं. त्यामुळे आज त्याला योग्य व्यासपीठ मिळालं आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेम दिलं, याचा मला खूप आनंद आहे.” दरम्यान, या मुलाखतीत शलाका पवारने ‘फू बाई फू’ कार्यक्रमातील अनेक रंजक आठवणी आणि पडद्यामागचे किस्सेही शेअर केले. तिच्या या आठवणींमधून सहकलाकारांबद्दलचा आदर, मैत्री आणि जिव्हाळा पुन्हा एकदा समोर आला.

Web Title: Actress shalaka pawar shared memories of samir choughule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 07:18 PM

Topics:  

  • Samir Choughule

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.