आज अभिनेता समीर चौघुलेचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याची सहकलाकार आणि त्याची खास मैत्रिण नम्रता संभेराव हिने खास पोस्ट शेअर करत अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
‘गुलकंद’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट येत्या १ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच रसिकांचे लक्ष वेधले आहे. चित्रपटातील 'प्रेमाचा गुलकंद' हे बहारदार शीर्षकगीत संगीतप्रेमींच्या भेटीला आले.
'चंचल' गाण्याला मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीनंतर चित्रपटातील दुसरं गाणं 'चल जाऊ डेटवर' प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे .गंमतीदार अंदाजातील या गाण्याचे बोल, संगीत प्रेक्षकांना नक्कीच भावेल.
प्रसाद ओकने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधील विनोदवीर समीर चौघुलेचा 'सम्या सम्या मैफिलीत माझ्या' कार्यक्रम पाहिला आणि त्यानंतर त्याने समीरचे कौतुक करणारी पोस्ट लिहिली आहे.
'गुलकंद' चित्रपटातील पहिलंवहिलं गाणं 'चंचल' नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या सुरेल गाण्यानं रसिकांच्या मनाला हळूवार स्पर्श केलाय. गाण्यात दाखवण्यात आलेली सीन्स प्रेक्षकांच्या मनात घर करणारी आहेत.
व्हॅलेंटाईन डेनिमित्त ‘गुलकंद’ चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये सई आणि समीर यांच्यातील गोड संवाद आणि त्यांचे प्रेमळ नाते पाहायला मिळाले, ज्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत.
‘गुलकंद’च्या निमित्ताने सई ताम्हणकर आणि समीर चौघुले ही भन्नाट जोडी पहिल्यांदाच एकत्र आली असून प्रसाद ओक - ईशा डे यांचीही अफलातून जोडी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची क्रेझ महाराष्ट्रापुरतीच राहिली नाही, परदेशातील प्रेक्षकांमध्ये शोची क्रेझ आहे. लवकरच परदेशातल्या मराठी प्रेक्षकांना 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो लंडनमध्येही लाईव्ह पाहायला मिळणार आहे.