
amruta deshmukh
अमृता सध्या लक्ष्मी निवास मालिकेत सई नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. सई ही विश्वाची सगळ्यात जवळची मैत्रीण. जेव्हा जान्हवीचं लग्न जयंतबरोबर होतं त्यावेळी विश्वा पुर्णपणे एकटा पडला होता. त्यावेळी त्याच्या आयुष्यात सई आली. एकट्या पडलेल्या विश्वाला तिने मैत्रीचा हात दिला. हळूहळू त्या दोघांमध्ये देखील मैत्रीचं नातं फुलत गेलं. त्यांच्या मोकळेपणा पाहत दोघांच्या घरच्यानी यांचं लग्न लावून द्यायचं ठरवतात. पण विश्वाच्या आयुष्यात पुन्हा एकदा जान्हवी येते. ती तिची ओळख सगळ्य़ांना तनुजा या नावााने सांगते पण विश्वाला तिच्याबाबत सर्व काही माहित असतं. या तनुजाशी देखील सई चांगल्या मैत्रीणीसारखं वागते. मालिकेतील तिच्या या पात्राबातत तिने एक किस्सा सांगितला आहे.
अमृता म्हणाली की, जेव्हा तिला या भुमिकेसाठी विचारण्यात आलं त्यावेळी तिचा नवरा अभिनेता प्रसाद जवादे याबाबत काहीसा साशंक होता. त्यासा असं वाटत होतं की खरच तू ही भुमिका करणार आहेस का ? त्याचं म्हणणं यासाठी होतं होत कारणं मालिकेच्या मुख्य कुटुंबातील माझी भुमिका नव्हती. मी दुसऱ्या कुटुंबात होते. पण मला त्याबाबत काहीच हरकत नव्हती. कारण मालिका आणि कलाकार चांगले आहेत हे मला माहित होतं. जेव्हा चॅनेलकडून विचारणा करण्यात आली त्यावेळी मी होकार दिला.
आजही जेव्हा मी नियम आणि अटी लागू य़ा नाटकाचे प्रयोग करते त्यावेळी मला अनेक प्रेक्षक नाटक संपल्यानंतर येऊन भेटतात तेव्हा मालिकेतल्या सईच्या भुमिकेचं कौतुक करतात. मग तेव्हा लक्षात येतं की प्रेक्षकांच्या अजूनही सई लक्षात आहे. याबरोबर अमृताने आतापर्यंतच्या तिच्या कारकिर्दीतले अनेक चांगले वाईट किस्से देखील सांगितले.
अमृताच्या फ्रंटवर्कबाबत सांगायचं झालंच तर सध्या ती, संकर्षण कऱ्हाडे याच्या नियम व अटी लागू या नाटकात काम करत आहे. नवरा बायकोच्या नात्यावर विनोदी अंगाने भाष्य करणाऱ्या या नाटकाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळत आहे.