Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी ६ च्या विजेत्याला ट्रॉफीसह मिळणार तब्बल ‘एवढे’ लाख, ‘हा’ स्पर्धक मारणार बाजी?

बिग बॉस मराठी चा सीझन ६ चा ग्रँड फिनाले आज पार पडणार असून विजेत्याला एवढी रक्कम मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. आता या सीझनचा विजेता कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 19, 2026 | 08:28 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • आज पार पडणार बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले 
  • ऑनलाइन वोटिंगमध्ये हे दोन स्पर्धक पुढे
  • बिग बॉस मराठी ६ च्या विजेत्याला मिळणार ऐवढी रक्कम
बिग बॉस मराठी चा सीझन ६ आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. आज, म्हणजेच अक्षय तृतीया (रविवार, १९ एप्रिल २०२६) या शुभ मुहूर्तावर या सीझनचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. सध्या सोशल मीडियावर आणि ऑनलाइन वोटिंगच्या ट्रेंडनुसार, अंतिम फेरीतील सर्व स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. प्रत्येक फायनलिस्टला प्रेक्षकांचा चांगला पाठिंबा मिळत असल्यामुळे नेमका विजेता कोण ठरेल, हे सांगणं कठीण झालं आहे. मात्र, काही वोटिंगच्या अंदाजानुसार एक-दोन स्पर्धक आघाडीवर असल्याचं चित्र दिसत असलं तरी अंतिम निकाल पूर्णपणे प्रेक्षकांच्या वोटिंगवरच अवलंबून असेल.आता सर्वांच्या नजरा आज होणाऱ्या ग्रँड फिनालेकडे लागल्या असून, बिग बॉस मराठी ६ चा किताब कोणाच्या नावावर होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

ऑनलाइन वोटिंगमध्ये हे दोन स्पर्धक पुढे

सध्या सुरू असलेल्या ऑनलाइन वोटिंगच्या ट्रेंडनुसार, तन्वी कोलते आणि राकेश बापट यांच्यात विजेतेपदासाठी लढत सुरू आहे. हे दोघेही सध्या पुढे दिसत असून, राकेश बापट ची लोकप्रियता थोडी जास्त असल्यामुळे त्याला किंचित जास्त पाठिंबा मिळाल्याचं दिसत आहे. मात्र, तन्वी कोलतेचा मजबूत फॅनबेस कोणत्याही क्षणी निकाल बदलू शकतो.अनुश्री माने या टॉप दोन स्पर्धकांच्या थोड्या मागे आहे, तर विशाल कोटियन आणि दीपाली सय्यद सध्या स्पर्धेत मागे असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हायरल रेडिट पोस्टही चर्चेत आहे, ज्यामध्ये विशाल कोटियन ला आधीच हा सीझन जिंकल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे फिनालेपूर्वीच प्रेक्षकांमध्ये आणखी उत्सुकता वाढली आहे.अखेरचा निकाल मात्र ग्रँड फिनाले एपिसोड प्रसारित झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे, जो आज रविवारी पाहायला मिळेल.

 

बिग बॉस मराठी ६ च्या विजेत्याला मिळणार ऐवढी रक्कम

बिग बॉस मराठी ६ च्या विजेत्याला यंदा १५ लाख रुपये रोख बक्षीस आणि आकर्षक ट्रॉफी दिली जाणार आहे. सुरुवातीला बक्षीस रक्कम कमी होती, मात्र Rakhi Sawant ने ७ लाख रुपये पूलमध्ये वाढवले, अशी माहिती समोर आली आहे.त्यामुळे एकूण बक्षीस रक्कम वाढून १५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे स्पर्धकांमध्ये जिंकण्याची उत्सुकता आणखी वाढली आहे.

बिग बॉस मराठी ६ चा बहुप्रतीक्षित ग्रँड फिनाले आज, रविवार (१९ एप्रिल २०२६) रोजी रंगणार आहे. हा अंतिम सोहळा रात्री ८ वाजल्यापासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.या सीझनचा विजेता रात्री साधारण ११ ते १२ वाजण्याच्या दरम्यान जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. हा विजेता लोकप्रिय अभिनेता Riteish Deshmukhच्या हस्ते घोषित केला जाईल.सध्या स्पर्धकांमध्ये तगडी चुरस पाहायला मिळत असून, कोण विजेतेपद पटकावणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Web Title: Bigg boss marathi 6 the winner will take home a trophy along with a whopping cash prize of this many lakhs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 08:28 AM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • Raqesh Bapat
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 6: अभिजीत सावंतच्या जादुई आवाजात राकेशच्या ‘तुम’ बीन गाण्याला 20 वर्षांनंतर उजाळा, स्पर्धकांना केलं मंत्रमुग्ध
1

Bigg Boss Marathi 6: अभिजीत सावंतच्या जादुई आवाजात राकेशच्या ‘तुम’ बीन गाण्याला 20 वर्षांनंतर उजाळा, स्पर्धकांना केलं मंत्रमुग्ध

Bigg Boss Marathi 6: ड्रामा, टास्क आणि धक्कादायक एलिमिनेशन, ‘हे’ 5 मोमेंट्स ठरले बिग बॉस मराठी सीझन 6 चे अविस्मरणीय क्षण
2

Bigg Boss Marathi 6: ड्रामा, टास्क आणि धक्कादायक एलिमिनेशन, ‘हे’ 5 मोमेंट्स ठरले बिग बॉस मराठी सीझन 6 चे अविस्मरणीय क्षण

BB Marathiमध्ये स्टार्सची एन्ट्री; मेघा, पुष्कर, शिवच्या मते कोण जिंकणार बिग बॉस मराठी? पाहा Promo
3

BB Marathiमध्ये स्टार्सची एन्ट्री; मेघा, पुष्कर, शिवच्या मते कोण जिंकणार बिग बॉस मराठी? पाहा Promo

Rakhi Sawant : एक नाही, दोन नाही… तब्बल दहा लाखांचा ड्रेस! Bigg Boss Marathi 6 Finale साठी राखीची जय्यत तयारी
4

Rakhi Sawant : एक नाही, दोन नाही… तब्बल दहा लाखांचा ड्रेस! Bigg Boss Marathi 6 Finale साठी राखीची जय्यत तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.