Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sameer Paranjape : अभिनेत्याची उंच झेप! ‘या’ मालिकेत गाजलेला पठ्ठया आता हॉटेल मालक, सुरु केला नवीन व्यवसाय

'मोहिनी - प्रेमाची फिल्मी कहाणी' फेम अभिनेता समीर परांजपे यांनी अभिनयासोबतच आता उद्योजकतेतही पदार्पण केले आहे. समीर लवकरच बार्शी येथे 'परांजपे उपाहार गृह' या नावाने शुद्ध शाकाहारी उपाहारगृह सुरू करणार असून याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 12, 2026 | 02:26 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.
  • ग्राहकांना अस्सल चवीचे शाकाहारी पदार्थ उपलब्ध करून देण्याचा त्याचा मानस असल्याचे या लोगोवरून स्पष्ट होते.
  • नव्या प्रवासाकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकार अभिनयासोबतच उद्योजकतेतही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करताना दिसत आहेत. या यादीत आता अभिनेता समीर परांजपे याचाही समावेश झाला आहे. ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ तसेच सध्या ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या समीरने आता खाद्यव्यवसायात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.

Pravin Tarde Proposal Video : ‘हीरोइनने मला 100 कोटी दिले…’ भर पार्टीमध्ये गुडघ्यावर बसत तरडेंनी केलं प्रपोज, VIDEO व्हायरल

समीर लवकरच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे ‘परांजपे उपाहार गृह’ या नावाने शुद्ध शाकाहारी उपाहारगृह सुरू करणार आहे. या उपक्रमाचा लोगो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, त्यामध्ये मिसळ-पाव, मेदू वडा, चहा यांसारख्या पारंपरिक खाद्यपदार्थांची झलक पाहायला मिळते. ग्राहकांना अस्सल चवीचे शाकाहारी पदार्थ उपलब्ध करून देण्याचा त्याचा मानस असल्याचे या लोगोवरून स्पष्ट होते.

या नव्या प्रवासाची घोषणा करताना समीरने, “आम्ही येतोय… तुमच्या जिभेचे चोचले पुरवायला! लवकरच बार्शीकरांच्या सेवेत…” असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे मुंबई किंवा पुण्याऐवजी बार्शीतच त्याचे पहिले उपाहारगृह सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ठाण्यात न्यूरोलॉजिकल आरोग्यसेवेला नवी दिशा; अभिनेत्री भाग्यश्रीच्या हस्ते विशेष क्लिनिक्सचे उद्घाटन 

समीरच्या या निर्णयाचे चाहते आणि मराठी कलाविश्वातील सहकाऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले आहे. अभिनेत्री अक्षया नाईक, ऋतुजा बागवे, क्षमा देशपांडे, श्वेता मेहेंदळे तसेच अभिनेता संग्राम समेळ यांनी कमेंट्सद्वारे त्याला शुभेच्छा देत नव्या व्यवसायासाठी भरभरून सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, समीर परांजपे सध्या ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ या मालिकेत आरकेची भूमिका साकारत आहे. या मालिकेत त्याच्यासोबत अभिनेत्री अनघा ठाकूर मुख्य भूमिकेत झळकत आहे. अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर आता समीर उद्योजक म्हणूनही नवी ओळख निर्माण करण्याच्या तयारीत असून, त्याच्या या नव्या प्रवासाकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Sameer paranjape started new hotel at barshi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • hotel

संबंधित बातम्या

Hotel Towels: हॉटेलमधून चेकआउट केल्यावर ‘त्या’ टॉवेलचं काय होतं? जाणून घ्या…
1

Hotel Towels: हॉटेलमधून चेकआउट केल्यावर ‘त्या’ टॉवेलचं काय होतं? जाणून घ्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.