Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Food Safety Complaint : मुंबई-पुणे महामार्गावरील हॉटेल-ढाब्यांवर प्रवाशांची लूट? मंत्री झिरवाळांचे तातडीच्या कारवाईचे आदेश

Food Safety Complaint: मुंबई-पुणे महामार्गावरील हॉटेल आणि ढाब्यांवर खासगी ट्रॅव्हल्स प्रवाशांकडून अवाजवी दर आकारले जात असल्याचा आरोप. एस. मुलाणी यांच्या तक्रारीनंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयाकडून तातडीच्या कारवाईचे निर्देश दिले आहेत.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 05, 2026 | 06:27 PM
Food Safety Complaint : मुंबई-पुणे महामार्गावरील हॉटेल-ढाब्यांवर प्रवाशांची लूट? मंत्री झिरवाळांचे तातडीच्या कारवाईचे आदेश

Food Safety Complaint : मुंबई-पुणे महामार्गावरील हॉटेल-ढाब्यांवर प्रवाशांची लूट? मंत्री झिरवाळांचे तातडीच्या कारवाईचे आदेश

Follow Us
Follow Us:
  • हजारो प्रवाशांची हॉटेल व्यावसायिकांकडून लूट
  • मंत्री नरहरी झिरवाळ यांना लेखी निवेदन
  • मंत्र्यांकडून तातडीने कारवाईचे आदेश
 

Food Safety Complaint : मुंबई – पुणे महामार्गावरून पश्चिम महाराष्ट्राकडे प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांची खासगी ट्रॅव्हल्स बसचालक आणि महामार्गावरील काही हॉटेल-ढाबा व्यावसायिकांकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. प्रवाशांकडून खाद्यपदार्थांसाठी अवाजवी दर आकारणे, निकृष्ट दर्जाचे अन्न पुरविणे आणि स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे अशा प्रकारांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे रुग्ण हक्क परिषद मंत्रालयीन सचिव एस. मुलाणी यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांना लेखी निवेदनाद्वारे जोरदार मागणी करत तक्रार केली आहे.
या गंभीर प्रकाराबाबत महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडे महाराष्ट्र शासनाच्या रुग्ण हक्क परिषदेचे मंत्रालयीन सचिव एस. मुलाणी यांनी लेखी तक्रार केली असून, संबंधित हॉटेल-ढाब्यांवर विशेष तपासणी मोहीम राबविण्याची मागणी केली आहे. सदर निवेदनाची दखल घेऊन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयाकडून दिनांक 5 नोव्हेंबर 2026 रोजी ‘आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग तात्काळ कारवाई करावी’ असे आदेश देण्यात आल्याचे समोर आले आहे.

रात्री १० ते १ या वेळेत प्रवाशांची कोंडी; पर्याय नसल्याचा गैरफायदा..!

मुंबईहून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांकडे दररोज मोठ्या संख्येने खासगी ट्रॅव्हल्स बसेस धावतात. या बसेस रात्री साधारण 10 ते 1 या वेळेत महामार्गावरील ठरावीक हॉटेल आणि ढाब्यांवर थांबविल्या जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
काही ठिकाणी दररोज सुमारे 30 ते 35 ट्रॅव्हल्स बसेस थांबत असल्याची माहिती मिळाल्याचेही निवेदनात म्हटले आहे. रात्रीच्या वेळी प्रवाशांसमोर अन्य पर्याय उपलब्ध नसल्याचा गैरफायदा घेत खाद्यपदार्थांचे अवाजवी दर आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. प्रवाशांची गरज ही हॉटेल व्यावसायिकांच्या नफेखोरीचे साधन बनत असेल, तर हा प्रकार केवळ ग्राहकांची आर्थिक पिळवणूक नसून त्यांच्या विश्वासाचा उघड गैरफायदा घेण्याचा गंभीर प्रकार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ऐन दिवाळीत प्रवाशांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड; खासगी बसच्या तिकिटांत मोठी वाढ, 1100 चे तिकीट…

बसचालक आणि हॉटेल व्यावसायिकांमध्ये कमिशनचे अर्थकारण ?

या प्रकरणातील सर्वांत गंभीर बाब म्हणजे काही ट्रॅव्हल्स चालक आणि हॉटेल व्यावसायिक यांच्यात कमिशनच्या आधारे संगनमत असल्याचा संशय निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे. विशिष्ट हॉटेलवरच बसेस थांबविण्यामागे आर्थिक व्यवहार आहेत काय, प्रवाशांना पर्यायी हॉटेलवर उतरण्याची संधी का दिली जात नाही आणि हॉटेल व्यावसायिकांकडून चालकांना कोणत्या स्वरूपाचे आर्थिक लाभ दिले जातात काय, याची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.
कमिशनच्या व्यवहाराचे आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. महामार्गावरील काही हॉटेल आणि ढाब्यांमध्ये अन्नपदार्थांचा दर्जा, स्वयंपाकघरातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तसेच खाद्यपदार्थांच्या साठवणुकीबाबत गंभीर तक्रारी प्राप्त होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Mumbai Local Train News: दंडाची रक्कम ऐकताच  महिलेचा संताप; टीसीला शिवीगाळ करत ओरबडले अन् थेट हाताला दाताने डसले!

 

केवळ नोटिसांचा फार्स नको; थेट तपासणी आणि कठोर कारवाई करा..!

एस. मुलाणी यांनी आपल्या निवेदनात महामार्गावरील संबंधित हॉटेल आणि ढाब्यांची अन्न व औषध प्रशासनामार्फत विशेष तपासणी करण्याची मागणी केली आहे. यामध्ये अन्नपदार्थांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करणे, स्वच्छता आणि अन्नसुरक्षा परवान्यांची पडताळणी करणे, खाद्यपदार्थांचे दरपत्रक तपासणे, बिल देण्याच्या पद्धतीची चौकशी करणे तसेच संशयास्पद आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मंत्र्यांच्या कार्यालयाकडून तात्काळ तपासणीचे निर्देश

या तक्रारीची दखल घेत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयाने संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ तपासणी करण्याचे निर्देश दिल्याची नोंद प्राप्त निवेदनावर करण्यात आली आहे. मात्र, या निर्देशांनंतर प्रत्यक्ष किती हॉटेल आणि ढाब्यांची तपासणी झाली, किती अन्न नमुने घेण्यात आले, किती ठिकाणी नियमांचे उल्लंघन आढळले आणि किती व्यावसायिकांवर कारवाई होईल हे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानंतर समजेल.
त्यामुळे आता केवळ कागदोपत्री आदेश देऊन प्रशासन थांबणार की महामार्गावरील प्रवाशांच्या आर्थिक पिळवणुकीला आणि निकृष्ट अन्नविक्रीला आळा घालण्यासाठी प्रत्यक्ष कठोर कारवाई करणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुंबई-पुणे महामार्गावरील हॉटेल-ढाब्यांबाबत काय तक्रार करण्यात आली आहे?

    Ans: खासगी ट्रॅव्हल्समधील प्रवाशांकडून खाद्यपदार्थांसाठी अवाजवी दर आकारले जात असल्याचा आणि निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • Que: ही तक्रार कोणी केली आहे?

    Ans: रुग्ण हक्क परिषदेचे मंत्रालयीन सचिव एस. मुलाणी यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

  • Que: ट्रॅव्हल्स चालक आणि हॉटेल व्यावसायिकांवर कोणता आरोप आहे?

    Ans: काही ट्रॅव्हल्स चालक आणि हॉटेल व्यावसायिकांमध्ये कमिशनच्या माध्यमातून आर्थिक संगनमत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या आरोपांची चौकशी करण्याची मागणी आहे.

Web Title: Mumbai pune highway hotels dhabas passenger overcharging food safety complaint rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 06:27 PM

Topics:  

  • hotel
  • Mumbai-Pune Highway

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.