Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेचा नवा डिजीटल प्रवास! ‘मराठी वारसा’ यूट्यूब वाहिनीवर पहिला भाग प्रसारित

‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही लोकप्रिय मालिका २० जूनपासून ‘मराठी वारसा’ या यूट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डॉ. अमोल कोल्हे यांच्या मते, फुले दांपत्यांचा समतेचा आणि शिक्षणाचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या डिजिटल उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 20, 2026 | 09:07 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका आता डिजिटल माध्यमातून नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २० जूनपासून ही मालिका ‘मराठी वारसा’ या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध होणार असून, मराठी दूरचित्रवाणीच्या इतिहासात अशा प्रकारे डिजिटल पुनरागमन करणाऱ्या मालिकांपैकी ही एक महत्त्वाची मालिका ठरणार आहे.

Mardini Trailer Out : ‘ज्याला आई मारी त्याला कोण तारी!’ आईच्या संघर्षाची थरारक कथा; ‘या’ तारखेला येईल अनुभवता

या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले की, फुले दांपत्यांचा समाजपरिवर्तनाचा लढा, शिक्षणाचा प्रसार आणि समतेचा संदेश नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. त्यांच्या मते, ही मालिका केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून सामाजिक जाणीवा जागृत करणारी प्रेरणादायी कलाकृती आहे.

डॉ. कोल्हे यांनी पुढे सांगितले की, या डिजिटल प्रवासामुळे निर्मात्यांसाठी नव्या शक्यता निर्माण होतील. यूट्यूबनंतर टप्प्याटप्प्याने इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवरही मालिकेचा विस्तार करण्याची योजना आहे. तसेच भविष्यात ही मालिका हिंदी, तामिळ, तेलगू, इंग्रजी आणि बंगाली अशा विविध भाषांमध्ये डब करून देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचाही मानस व्यक्त करण्यात आला.

यासोबतच ‘मराठी वारसा’च्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर ऑडिशन टॅब सुरू करण्यात आल्याची माहिती देत डॉ. कोल्हे यांनी नवोदित आणि गुणवंत कलाकारांना थेट संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. यामुळे कलाकार आणि निर्माते यांच्यातील अंतर कमी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.

Siddharth Khirid : किती गोड! महिनाभरानंतर अभिनेत्याची पत्नीशी झाली भेट, या भावनिक क्षणांना पाहून चाहते भावुक

मराठी मनोरंजन क्षेत्रात आशयप्रधान आणि लोकाभिमुख कंटेंटला चालना देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, भविष्यात अशा अनेक सर्जनशील प्रयोगांना तो प्रेरणा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या शब्दांत, ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका आता केवळ आमची राहिलेली नाही, तर ती संपूर्ण महाराष्ट्राची मालिका बनली आहे.

Web Title: The new digital journey of the savitribai jotirao phule series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 09:07 PM

Topics:  

  • Savitribai Phule Pune University

संबंधित बातम्या

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय; परीक्षा केंद्रांचे लेखापरीक्षण होणार
1

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय; परीक्षा केंद्रांचे लेखापरीक्षण होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.