Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Music Day : ‘सावली’मुळे संगीताशी आणखी घट्ट नातं जडलं; प्राप्ती रेडकरचा खास अनुभव

Prapti Redkar हिने जागतिक संगीत दिनानिमित्त संगीताशी असलेल्या आपल्या खास नात्याविषयी भावना व्यक्त केल्या. ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील ‘सावली’ची भूमिका साकारताना संगीताच्या आणखी जवळ गेल्याचे तिने सांगितले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 20, 2026 | 02:20 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • मालिकेतील काही भावनिक क्षणांबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या.
  • आवडत्या गायिकांपैकी एक असल्याचेही प्राप्तीने सांगितले.
  • संगीत माणसाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकते, असा तिचा विश्वास आहे.
World Music Day : ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील ‘सावली’ या भूमिकेमुळे अभिनेत्री प्राप्ती रेडकर प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे. मालिकेतील या पात्राच्या आयुष्यात संगीताला महत्त्वाचे स्थान असून, त्याच माध्यमातून तिच्या आयुष्याला नवी दिशा मिळताना दिसते. जागतिक संगीत दिनानिमित्त प्राप्तीने संगीताशी असलेल्या तिच्या वैयक्तिक नात्याबद्दल आणि मालिकेतील काही भावनिक क्षणांबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या.

या सुंदरीची नजरच काफी, तिच्या दारात उभी चारचाकी! Radha Patil ची नवी कोरी गाडी पाहिलीत का?

प्राप्तीने सांगितले की, तिच्या वडिलांचे नाव प्रवीण रेडकर असून ते व्यावसायिक गायक आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच घरात संगीताचे वातावरण होते. ती वडील आणि काकांसोबत गावातील भजन कार्यक्रमांना जात असे आणि तिथे गाणीही म्हणत असे. अभिनय क्षेत्रात आल्यामुळे गायनाकडे फारसे लक्ष देता आले नाही, मात्र ‘सावली’ ही भूमिका साकारताना ती पुन्हा संगीताच्या अधिक जवळ आली. विशेष म्हणजे, मालिकेत सावलीला आवाज दिला आहे गायिका केतकी माटेगावकर यांनी आणि त्या तिच्या आवडत्या गायिकांपैकी एक असल्याचेही प्राप्तीने सांगितले.

मालिकेतील ‘माझे माहेर पंढरी २.०’ हे गाणे तिच्यासाठी अत्यंत खास असल्याचे ती म्हणाली. या प्रसंगात सावलीचे खरे गायकत्व सर्वांसमोर उलगडते आणि तिच्या आयुष्यातील मोठे सत्य समोर येते. हे दृश्य चित्रीत करताना आपण प्रत्यक्षात भावूक झालो होतो, असे सांगताना प्राप्तीने त्या प्रसंगातील भावना पुन्हा व्यक्त केल्या. सावलीने आयुष्यात खूप संघर्ष केला असून, तिला तिच्या कर्तृत्वाची योग्य ओळख आणि प्रेम मिळताना पाहून स्वतःलाही अश्रू अनावर झाल्याचे तिने नमूद केले.

जागतिक संगीत दिनाच्या शुभेच्छा देताना प्राप्ती म्हणाली की, संगीत ही तिच्यासाठी एक प्रकारची थेरपी आहे. आनंद, दुःख, राग किंवा कोणतीही भावना असो, ती प्रत्येक वेळी संगीताशी जोडली जाते आणि गाण्यांमधून स्वतःला व्यक्त करते. संगीत माणसाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकते, असा तिचा विश्वास आहे.

जिद्द म्हणावी की आवड… एक उत्कृष्ट कलाकार! श्रद्धा कपूरचा आगामी चित्रपट ‘ईठा’चा टीझर ऑनलाईन लीक

तिने प्रेक्षकांचे आभार मानत सांगितले की, ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेला दोन वर्षे पूर्ण झाली असली तरी आजही प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम आणि पाठिंबा तितकाच कायम आहे. त्यामुळे ही भूमिका तिच्या आयुष्यात कायम विशेष राहणार असल्याचेही प्राप्तीने स्पष्ट केले. प्रेक्षकांना आवाहन करत तिने ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका दररोज दुपारी १ वाजता झी मराठीवर पाहण्याचे आवाहन केले.

Web Title: World music day prapti redkar savlyachi janu savali shared her relationship with music

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 02:20 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.