Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सनई चौघडे’मुळे पुन्हा बहरली मेघना एरंडे जोशी-अदिती सारंगधर यांची कॉलेजमधील मैत्री

अभिनयाच्या प्रवासात अनेक कलाकारांची मैत्री जुळते, तर काही नाती काळाच्या ओघात हरवून जातात. मात्र योग्य संधी मिळाल्यावर ती पुन्हा नव्याने फुलतात. झी मराठीवरील 'सनई चौघडे' मालिकेमुळे अभिनेत्री मेघना एरंडे जोशी आणि अदिती सारंगधर यांची अशीच अनेक वर्षांपूर्वीची कॉलेजमधील मैत्री पुन्हा बहरली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 31, 2026 | 05:28 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

काही नाती अशी असतात की काळ, अंतर आणि आयुष्यातील धावपळ यामुळे त्यांच्यातील संपर्क कमी होतो; मात्र भेट झाली की ती पुन्हा पूर्वीसारखीच फुलतात. अशीच एक सुंदर मैत्री पुन्हा बहरली आहे झी मराठीवरील ‘सनई चौघडे’ या मालिकेमुळे. मालिकेत ‘पमा परब’ ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मेघना एरंडे जोशी यांनी सहकलाकार अदिती सारंगधरसोबतच्या त्यांच्या अनेक वर्षांपूर्वीच्या मैत्रीबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Ramayana Movie: भारतच नव्हे, पाकिस्तानातही ‘रामायण’ची क्रेझ; ट्रेलर पाहून पाकिस्तानी नेटकऱ्यांनी केलं तोंडभरून कौतुक

मेघना यांनी सांगितले की, त्या आणि अदिती अकरावीपासून पदवीपर्यंत एकाच बॅचमध्ये होत्या. अदिती रुईया महाविद्यालयात शिकत होती, तर मेघना रुपारेल महाविद्यालयात. त्या काळात विविध एकांकिका स्पर्धांमुळे दोघींची सातत्याने भेट होत असे. विशेष म्हणजे अभिनय क्षेत्रात असूनही त्यांच्यात कधीही स्पर्धेची भावना नव्हती. उलट एकमेकींच्या कामाचे मनापासून कौतुक करण्याची सवय होती. कॉलेजचे दिवस संपल्यानंतर दोघी आपल्या-आपल्या करिअरमध्ये व्यस्त झाल्या आणि संपर्क केवळ ‘हाय-हॅलो’पुरताच मर्यादित राहिला.

‘सनई चौघडे’मुळे दोघींना पुन्हा एकत्र काम करण्याची संधी मिळाली आणि त्यातून जुनी मैत्री नव्या उत्साहाने फुलली. मालिकेत त्यांच्या भूमिका मात्र पूर्णपणे विरुद्ध स्वभावाच्या आहेत. मेघना साकारत असलेली ‘पमा’ ही व्यक्तिरेखा ‘तेजस्विनी’ला घाबरते, तर तेजस्विनीला पमाची उपस्थितीही आवडत नाही. मात्र कॅमेरा बंद झाल्यानंतरचे चित्र पूर्णपणे वेगळे असल्याचे मेघना सांगतात.

त्यांच्या मते, दोघींचे मेकअप रूम शेजारी असल्याने शूटिंगदरम्यान बराच वेळ एकत्र घालवण्याची संधी मिळते. त्या एकत्र जेवतात, कॉफी पितात, गाणी ऐकतात, व्हिडिओ पाहतात आणि भरपूर गप्पा मारतात. अदितीला मेघनाच्या डब्यातील थोड्या गोडसर भाज्या आवडतात, तर अदितीही स्वतः काही खास पदार्थ बनवून मेघनासाठी घेऊन येते. दोघी एकत्र राजगिऱ्याचे लाडू खातात. एकमेकींना भेटवस्तू देण्याचीही त्यांची खास परंपरा आहे. मेघनाने अदितीला वॉटर सिपर भेट दिला होता, तर अदितीने घुंगरूंनी सजवलेली सुंदर डिझायनर बॅग भेट म्हणून दिली.

मैत्रीचा आणखी एक विशेष पैलू म्हणजे अध्यात्म. मेघनाच्या मेकअप रूममध्ये असलेल्या स्वामींच्या मूर्तीला अदिती आवर्जून नमस्कार करते. अदिती रेकीचा सराव करते, तर मेघना प्राणिक हीलिंगशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे अध्यात्म, सकारात्मक ऊर्जा आणि जीवनाविषयीचे विचार यांवरही दोघींमध्ये अनेकदा चर्चा रंगते. संगीताची आवडही दोघींना समान असल्याने सेटवर वेळ मिळाला की त्या एकत्र संगीताचा आनंद घेतात.

मेघना सांगतात की, दोघींचे स्वभाव मात्र एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत. अदिती अत्यंत ठाम, उत्साही, बिनधास्त आणि रॉकस्टारसारखी व्यक्तिमत्त्व असलेली आहे, तर स्वतः मेघना शांत, कमी बोलणारी आणि भावगीतासारख्या स्वभावाची आहेत. मात्र कदाचित हाच त्यांच्या मैत्रीचा सर्वात मोठा गुण आहे. वेगवेगळे स्वभाव असूनही त्या एकमेकींना समजून घेतात, साथ देतात आणि मनातील अनेक गोष्टी एकमेकींसोबत शेअर करतात.

Patri Sarkar: स्वातंत्र्यलढ्याची धग रूपेरी पडद्यावर; ‘पत्री सरकार १९४२’चे पहिले पोस्टर प्रदर्शित

मेघना पुढे म्हणाल्या की, सेटवर अदितीचे शूटिंग नसले की तिची आठवण येते. ती सेटवर आली की संपूर्ण वातावरणच प्रसन्न आणि आनंदी होते. ‘सनई चौघडे’मुळे मला माझी जुनी मैत्रीण पुन्हा मिळाली. ही मैत्री आजही तितकीच सुंदर, प्रामाणिक आणि घट्ट आहे. आयुष्याने आम्हाला पुन्हा एकदा एकत्र आणले, याचा मला मनापासून आनंद आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘सनई चौघडे’ने प्रेक्षकांना केवळ एक नवी कथा दिली नाही, तर दोन जुन्या मैत्रिणींना पुन्हा एकत्र आणण्याचे निमित्तही ठरले आहे. पडद्यावरील संघर्ष आणि पडद्यामागील जिव्हाळ्याची मैत्री यामुळे या दोघींची केमिस्ट्री प्रेक्षकांचेही लक्ष वेधून घेत आहे. ‘सनई चौघडे’ ही मालिका दररोज रात्री ८.३० वाजता झी मराठीवर प्रसारित होत असून प्रेक्षकांकडून तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: Meghna erande joshi and aditi sarangdhars college friendship blossomed again thanks to sanai choughade

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 05:28 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.