Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tumbadchi Manjula : राहुल देशपांडे-आर्या आंबेकरच्या सुरांतून ‘तुंबाडची मंजुळा’तील आगळंवेगळं गाव उलगडणार

Zee Studios निर्मित ‘तुंबाडची मंजुळा’ चित्रपटातील ‘असं वेगळं गाव’ हे गाणं प्रदर्शित होताच चर्चेत आलं आहे. या गाण्यात Rahul Deshpande आणि Arya Ambekar यांच्या सुरेल आवाजाने विशेष आकर्षण निर्माण केलं आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 22, 2026 | 07:07 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

Zee Studios निर्मित ‘तुंबाडची मंजुळा’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. टीझरमध्ये दिसलेलं रहस्यमय आणि हटके गाव प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरलं आहे. या पार्श्वभूमीवर आता चित्रपटातील ‘असं वेगळं गाव’ हे पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं असून, ते प्रेक्षकांना एका अनोख्या गावाच्या दुनियेत घेऊन जात आहे.
या गाण्याचं खास आकर्षण म्हणजे शास्त्रीय आणि सुगम संगीतातील प्रसिद्ध गायक Rahul Deshpande आणि गोड आवाजासाठी ओळखली जाणारी Arya Ambekar यांची सुरेल साथ. या दोघांनी पहिल्यांदाच एकत्र गाणं सादर केल्याने संगीतप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. त्यांच्या आवाजातील भावपूर्णता, सहजता आणि नजाकत गाण्याला वेगळीच उंची देत असून, गाणं ऐकताना प्रेक्षक त्या गावाच्या वातावरणात हरवून जातात.

Jyoti Saxena : Nude Video Call साठी केली 20 हजारांची मागणी! सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे ‘ते’ Chats झाले व्हायरल

या गाण्याबद्दल बोलताना राहुल देशपांडे म्हणाले की, “या चित्रपटातील हे गाणं खूप फ्रेश आणि वेगळ्या धाटणीचं आहे. आधुनिक संगीतासोबतच यात गावाकडचा गंध सुंदरपणे जपण्यात आला आहे. शब्द आणि चाल दोन्ही आजच्या काळाशी सुसंगत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना हे गाणं नक्कीच आवडेल.” तर आर्या आंबेकरनेही आपल्या भावना व्यक्त करत सांगितलं की, “हे गाणं एका गावाची सुंदर आणि भावनिक गोष्ट सांगतं. अशा प्रकारचं गाणं मी पहिल्यांदाच गात असून, चित्रपटात हे गाणं पाहताना प्रेक्षकांना त्याची वेगळेपणाची जाणीव होईल.”

‘असं वेगळं गाव’ हे गाणं गावकऱ्यांच्या अतरंगी, सतरंगी आणि मनमोकळ्या स्वभावाचं जिवंत चित्र उभं करतं. एकमेकांशी जिव्हाळ्याने जोडलेली माणसं, त्यांच्या नात्यांतील ऊब, आनंद आणि मस्ती या सगळ्यांचा सुरेल संगम या गाण्यातून अनुभवायला मिळतो. कोकणातील निसर्गरम्य लोकेशन्सवर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात हिरवाई, साधेपणा आणि गावाकडच्या जीवनाचं सौंदर्य अत्यंत प्रभावीपणे टिपण्यात आलं आहे.

या गाण्याचे शब्द विक्रम एडके यांनी लिहिले असून असीम कुऱ्हेकर, प्रतीक केळकर आणि तेजस जोशी या संगीतकार त्रयींनी ते संगीतबद्ध केलं आहे. चित्रपटाच्या एकूण भावविश्वाला दिशा देणारं हे गाणं असल्याचं निर्मात्यांकडून सांगण्यात येत आहे. Bavesh Janavlekar यांनीही या गाण्याचं कौतुक करत म्हटलं की, “हे गाणं चित्रपटाचा सूर निश्चित करतं. कोकणातील गावावर आधारित असलं तरी प्रत्येक प्रेक्षकाला ते आपल्या मातीशी जोडणारं वाटेल.”

हॉटेलमध्ये धुवावी लागली होती प्लेट आणि… जातीवादामुळे धक्कादायक वागणूक, ‘पंचायत’ सीरीजच्या अभिनेत्यासोबत नेमकं काय घडलं?

या चित्रपटाचं लेखन Rishikesh Turai यांनी केलं असून दिग्दर्शन Vaibhav Korgaonkar यांनी केलं आहे. चित्रपटात Jitendra Joshi, Sai Tamhankar, Om Bhutkar, Makarand Anaspure, Anshuman Vichare, Usha Nadkarni यांसारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. ‘तुंबाडची मंजुळा’ हा चित्रपट येत्या ५ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्यातील हे गाणं आधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

Web Title: Rahul deshpande arya ambekars songs will reveal the different village in tumbadchi manjula

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 07:07 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.