Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Second Love : आणखी एक संधी, आणखी एक प्रेमकथा! ‘सेकंड लव्ह’ रिअॅलिटी शोची घोषणा; रम्या कृष्णन करणार सूत्रसंचालन

‘सेकंड लव्ह’ हा नवा तमिळ रिअॅलिटी शो लवकरच जिओहॉटस्टारवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, अभिनेत्री रम्या कृष्णन त्याचे सूत्रसंचालन करणार आहेत. प्रेमभंग किंवा अपयशी नात्यांचा अनुभव घेतलेल्या १२ अविवाहित स्पर्धकांना या शोमध्ये प्रेमाला पुन्हा एक संधी दिली जाणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 18, 2026 | 08:22 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

 

Second Love : प्रेमभंगानंतर आयुष्याला आणि नात्यांना पुन्हा एक संधी देता येते का? याच संकल्पनेवर आधारित नवा तमिळ रिअॅलिटी शो ‘सेकंड लव्ह’ लवकरच जिओहॉटस्टारवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आघाडीची निर्मिती संस्था बनिजय एशियाने या शोची अधिकृत घोषणा केली असून, प्रसिद्ध अभिनेत्री रम्या कृष्णन या शोचे सूत्रसंचालन करणार आहेत. पारंपरिक डेटिंग शोपेक्षा वेगळी संकल्पना असलेल्या ‘सेकंड लव्ह’मध्ये १२ अविवाहित स्पर्धक सहभागी होणार आहेत. या सर्वांनी पूर्वी प्रेमभंग किंवा अपयशी नात्यांचा अनुभव घेतलेला आहे. शोदरम्यान विविध संवाद, भावनिक टास्क आणि अनुभवांच्या माध्यमातून ते पुन्हा प्रेमावर विश्वास ठेवण्याचा आणि नव्या नात्याची सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील.

Preity Zinta : प्रीती झिंटाला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा! डिजिटल प्लॅटफॉर्म्सविरोधात खटला दाखल करण्याची परवानगी

निर्मात्यांनी सोशल मीडियावर शोचे पोस्टर शेअर करत “One more chance. One more love story” असा संदेश दिला आहे. पोस्टरमध्ये रम्या कृष्णन हातात पट्टी बांधलेले हृदय धरून उभ्या असल्याचे दिसते. या प्रतिमेतून तुटलेल्या नात्यांनंतरही प्रेमाला दुसरी संधी मिळू शकते, हा शोचा मुख्य संदेश अधोरेखित केला आहे. रम्या कृष्णन यांची या शोसाठी सूत्रसंचालक म्हणून निवड विशेष लक्षवेधी ठरत आहे. आपल्या दमदार अभिनयासोबतच प्रभावी व्यक्तिमत्त्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या त्या स्पर्धकांच्या भावनिक प्रवासात मार्गदर्शकाची भूमिका निभावणार आहेत. त्यामुळे शोला भावनिक आणि प्रेरणादायी स्वरूप मिळण्याची शक्यता आहे.

‘सेकंड लव्ह’मुळे बनिजय एशियाच्या रिअॅलिटी शोच्या यादीत आणखी एका वेगळ्या फॉरमॅटची भर पडणार आहे. भारतीय प्रेक्षकांसाठी नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार मनोरंजन सादर करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या निर्मिती संस्थेने गेल्या काही वर्षांत विविध भाषांमध्ये अनेक लोकप्रिय कार्यक्रम दिले आहेत. स्क्रिप्टेड कंटेंटच्या क्षेत्रात ‘द नाईट मॅनेजर’, ‘आर्या’, ‘द ट्रायल’, ‘होस्टेजेस’, ‘बॉम्बे बेगम्स’, ‘कॉल माय एजंट: बॉलिवूड’ आणि ‘ट्रायल बाय फायर’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांची निर्मिती बनिजय एंटरटेनमेंटने केली आहे. याशिवाय ‘हाऊस एम.डी.’च्या भारतीय रूपांतरावरही काम सुरू असल्याची माहिती आहे.

Premala Conditions Apply Trailer : ‘Office मधलं प्रेम’ जेव्हा दोन हृदयांच्या दरम्यान रूल्स आणि रेग्युलेशन येतात, नवी मराठी सिरीज

नॉन-स्क्रिप्टेड विभागातही कंपनीने ‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’, ‘मास्टरशेफ इंडिया’, ‘एमटीव्ही रोडीज’, ‘द कपिल शर्मा शो’ आणि ‘इंटू द वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स’ यांसारख्या लोकप्रिय फ्रँचायझी प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत. त्यामुळे ‘सेकंड लव्ह’कडूनही मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. प्रेमभंगानंतर नव्याने आयुष्य जगण्याचा आणि पुन्हा प्रेमावर विश्वास ठेवण्याचा संदेश देणारा हा शो प्रेक्षकांना भावनिकदृष्ट्या जोडून ठेवेल, अशी चर्चा आहे. जिओहॉटस्टारवर लवकरच प्रदर्शित होणाऱ्या या कार्यक्रमाकडे आता मनोरंजनप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Web Title: Second love reality show announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 08:22 PM

Topics:  

  • Reality Show
  • tv reality show

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.