Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raja Shivaji Marathi Movie : मराठी मालिकेतले ‘हे’ चेहरे झळकणार मोठ्या पडद्यावर! ‘Chhatrapati’ गाण्यात दिसली झलक

राजा शिवाजी हा चित्रपट 1 मे 2026 रोजी जगभर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात Riteish Deshmukh छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असून Genelia Deshmukh त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 16, 2026 | 12:09 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी हा चित्रपट पाहण्यास उत्सुक आहे
  • विशेष म्हणजे या सिनेमात मराठी मालिकेतील काही कलाकारमंडळीही दिसून आली आहे
  • अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेले आणि स्वतःच गायलेल्या या गाण्यात 80 गायकांनी कोरस गायले आहे
अभिनेता रितेश देशमुख स्टारर सिनेमा ‘राजा शिवाजी’ 1 मे 2026 रोजी जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे. सिनेमाच्या Teaser ने चाहत्यांच्या मनात उत्सुकता वाढवली आहे. तसेच जगभरातील तमाम छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी हा चित्रपट पाहण्यास उत्सुक आहे. सिनेमात स्वतः रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. तर रितेशची पत्नी अभिनेत्री जेनेलिया देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांचे पात्र महेश मांजरेकरने साकारले आहे. तर छत्रपतींचे भाऊ संभाजीराजे शहाजीराजे भोसले यांचे पात्र अभिषेक बच्चनने साकारले आहे. चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत देशभरात प्रसिद्ध केला जाणार आहे.

Rakhi Sawant : एक नाही, दोन नाही… तब्बल दहा लाखांचा ड्रेस! Bigg Boss Marathi 6 Finale साठी राखीची जय्यत तयारी

सिनेमात अनेक मराठी तसेच Bollywood मधील कलाकार झळकणार आहेत. सिनेमातला महत्वाचा खलनायक अफझल खानाची भूमिका संजय दत्तने साकारली आहे. तर fardeen Khan आणि Vidya Balan ही सिनेमात मोठ्या भूमिकेत आहे. विशेष म्हणजे या सिनेमात मराठी मालिकेतील काही कलाकारमंडळीही दिसून आली आहे. सिनेमात शिवानी मुंढेकर, आकाश नलावडे आणि कपिल होनराव झळकला आहे. मुरांबा मालिकेतील अभिनेत्री शिवानी मुंढेकर, साधी माणसं मालिकेतील आकाश नलावडे आणि सुख म्हणजे नक्की काय असत मालिकेतील कपिल होनराव ‘राजा शिवाजी’ सिनेमात झळकणार आहेत.

Sushant Singh Rajput : सुशांतच्या बहिणीने खरेदी केली Lavish Property! एका खोलीला दिले भावाचे नाव

छत्रपती गाण्यात दिसून आले ‘हे’ चेहरे!

राजा शिवाजी चित्रपटाचा Anthem ‘छत्रपती’ 13 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होता. परंतु, जेष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी येताच त्यांना श्रद्धांजली म्हणून तारीख पुढे ढकलण्यात आली. गाणे 15 एप्रिल या नव्या तारखेने प्रसिद्ध करण्यात आले. अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेले आणि स्वतःच गायलेल्या या गाण्यात 80 गायकांनी कोरस गायले आहे. या गाण्यात शिवानी मुंढेकर, आकाश नलावडे आणि कपिल होनराव दिसून आला आहे. कपिल होनरावने आधीच जाहीर केले होते की त्याने राजा शिवाजी चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे. त्यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहतेमंडळी उत्सुक आहेत.

Web Title: Shivani mundhekar akash nalawade and kapil honrao will appear in the marathi film raja shivaji

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 12:09 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.