फोटो सौजन्य - Social Media
सुशांत सिंह राजपूत आज जरी हयात नसला तरी त्याच्या चाहत्यांच्या आठवणीत तो नेहमी जिंवत आहे. महत्वाचे म्हणजे सुशांतच्या बहिणीने (श्वेता सिंग कीर्ती) सोशल मीडियावर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. श्वेताने चक्क भारताबाहेर एक लॅव्हिश प्रॉपर्टी खरेदी केली आहे, त्यामुळे सुशांतच्या चाहत्यांनी तिला डोक्यावर घेतले आहे. अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशामध्ये श्वेताने त्या प्रॉपर्टीमधील एक Room सुशांतच्या नावाने ओळखली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे चाहते अधिक भावुक झाले आहेत. या Room ला ‘सुशांत कॅबिन’ असे नाव देण्यात येणार आहे.
श्वेताने पोस्ट करत दिली बातमी!
सुशांतची बहीण श्वेताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने Mount Shasta, California येथे खरेदी केलेली Lavish Property दिसत आहे. तसेच तिने पोस्टखाली भावनिक कॅप्शन दिला आहे. तिने म्हंटले आहे की, “आज मला “शास्ता सॅन्क्च्युरी”ची चावी मिळाली, जे माझं खूप वर्षांचं स्वप्न होतं. वैदिक नववर्षाच्या दिवशी ही सुरुवात झाल्याने तो क्षण खास ठरला. ही जागा ध्यान, शांतता आणि डिजिटल डिटॉक्ससाठी तयार केली जात आहे. “मांझा” गाण्यामुळे सुशांतची आठवण झाली आणि त्याच्यासाठी एक खास केबिन ठेवायचं ठरवलं. अजून काम बाकी असलं तरी आजचा दिवस कृतज्ञता आणि स्वप्नपूर्तीचा आहे.”
एकंदरीत, सुशांतच्या बहिणीने कॅलिफोर्नियामध्ये एक लॅव्हिश प्रॉपर्टी खरेदी केली आहे, त्याच्या चाव्या काल 14 एप्रिल रोजी हातात आल्या आहेत. जेव्हा ती त्या ठिकाणावर आपली गाडी चालवत पोहचत होती, अगदी त्याचवेळी अचानक गाडीत सुशांतच्या चित्रपटातील ‘Manza’ गाणं सुरु झालं. ते ऐकून श्वेताच्या डोळ्यात अश्रू आले. भावाच्या आठवणीत तिने ठरवले की जेव्हा ही सेंचुरी खुली होईल तेव्हा त्यात एक ‘सुशांत कॅबिन’ असेल.
चाहत्यांनी केले अभिनंदन!
सुशांतच्या चाहत्यांनी श्वेताच्या या पोस्टला भावनिक प्रतिसाद दिला आहे. तिचे अभिनंदन केले आहे, तसेच ती वास्तू तयार झाली की आम्हाला ही त्याचे दर्शन घडवा असे त्यांनी सांगितले आहे.






