
Tejashri Pradhan And Rakesh Bapat Marriage: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनमधला अभिनेता राकेश बापट हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याच कारण देखील तितकंच विशेष आहे. राकेशने त्याच्या लग्नाबाबतचा एक किस्सा सांगितला तो किस्सा म्हणजे राकेश आणि तेजश्री प्रधानच्या लग्नाचा. अभिनेत्याने लग्नाबाबतचं स्पष्टीकरण देत या सगळ्याला पूर्ण विराम दिला आहे.
हिंदी सिनेविश्वात झळकल्यानंतर राकेशने मराठीत पुन्हा काम करायला सुरुवात केली. नवरी मिळे हिटलरला मालिका केल्यानंतर तो पुन्हा दिसला ते बिग बॉसच्या सहाव्या सिझनमध्ये. या रियालिटी शोचा राकेश उपविजेता ठरला असून आजही त्याला चाहत्यांकडून भरभरुन प्रेम मिळतं. नुकतच राकेशने एका मुलाखतीत त्याच्या लग्नाचा किस्सा सांगितला आहे.
राकेशच्या बहिणीला तिच्या मैत्रिणीने एक रिल पाठवली होती. त्यात असं सांगितलं होतं की, राकेश आणि तेजश्री प्रधान मे महिन्यात लग्न करणार आहे. हा रिल पाठवला तेव्हा राकेश बिग बॉसमध्ये होता. हे रिल पाठवल्यावर राकेशच्या बहिणीला तिच्या मैत्रिणीने विचारलं की हे खरं आहे का ? अनेक नातेवाईंकांचे फोनवर फोन येत होते की, लग्नाची तारिख देखील काढलीत आणि आम्हाला सांगितलं पण नाही ? खूप जणांनी असं देखील विचारलं की हे खरं आहे का ? तर काहींनी असं देखील म्हटलं की ही सून चालेल आम्हाला. असा मजेशीर किस्सा मुलाखतीत सांगतिला. या लग्नाच्या अफवांमुळे आम्हाला खूप जणांचे फोन आले.
राकेश पुढे असंही म्हणतो की, हे सगळं होत होतं त्यावेळी मी बिग बॉसच्या घरात होतो. जेव्हा माझ्या बहिणीने मला हे सांगितलं तेव्हा मला असं वाटलं की हे काय मध्येच. पण या सगळ्या अफवा होत्या हे राकेशने सांगितलं आणि सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चांना पुर्णविराम दिला.
राकेश बापट कधी वैयक्तिक तर कधी करिअरमुळे कोणत्या ना कोणत्या कारणाने कायमच चर्चेत असतो. राकेशचं पहिलं लग्न 2011 साली झालं होतं पण 2019 मध्ये त्याने पत्नी रिद्धी डोगराबरोबर घटस्फोट घेतला. जेव्हा राकेश बिग बॉसच्या घरात होता त्यावेळी त्याच्या एक्स पत्नीने त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. तिचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला होता.
Detective Dhananjay : थरार, कुतूहल आणि शिस्तबद्ध शूटिंग; मराठी OTT मालिकेबद्दल दिग्दर्शकाचे खुलासे