Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tharala Tar Mag मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीने घेतली Exit ; म्हणाली “खूप मनावर दगड ठेवून…. “

Tharala Tar Mag: स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग मालिका छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका आहे. मराठी मालिकांच्या टीआरपीमध्ये अव्वलस्थान कायमच या मालिकेने राखलं आहे. मालिका प्रेेक्षकांच्या पसंतीस येत असतानाच आता मालिकेतील एका अभिनेत्रीने एक्झिट घेतली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 22, 2026 | 01:23 PM
Tharala Tar Mag

Tharala Tar Mag

Follow Us
Follow Us:

 

  • Tharala Tar Mag मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीने घेतली Exit ;
  • म्हणाली “खूप मनावर दगड ठेवून…. “
Tharala Tar Mag Fame Sakshi : स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग मालिका छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका आहे. मराठी मालिकांच्या टीआरपीमध्ये अव्वलस्थान कायमच या मालिकेने राखलं आहे. फक्त सायली अर्जुनच नाही तर मालिकेतील इतर पात्रांवर देखील प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. मालिका प्रेेक्षकांच्या पसंतीस येत असतानाच आता मालिकेतील एका अभिनेत्रीने एक्झिट घेतली आहे.

सायली अर्जुन जशी लोकप्रिय जोडी आहे तसंच साक्षी, नागराज आणि महिपत यांनी साकारलेले नकारात्मक व्यक्तिरेखा देखील घराघरात पोहोचले आहेत. यांचा चाहतावर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे. मात्र साक्षीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्रीने मालिकेतून एक्झिट घेतल्याचं समोर येत आहे. साक्षी शिखरेचं पात्र साकारणारी अभिनेत्री केतकी पालव हिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.

Tharala Tar Mag : ‘घरात तीन मुलं सांभाळताना काय होतं?’ अर्जुन-सायलीचे मजेशीर अनुभव वाचून हसू आवरणार नाही

केतकीने याबाबत एका मुलाखतीत सांगितलं आहे की, साक्षीचं पात्र गेले तीन वर्ष केतकीने उत्तमरित्या साकारलं. पण आता तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेण्यामागे देखील तितकच महत्वाचं कारण आहे. साक्षीने एका मुलाखतीत सांगितलं की, “साक्षी या पात्राचा तीन वर्षांचा प्रवास इथेच थांबवताना खूप कठीण जात आहे. काही वैयक्तिक कारणांमुळे मला मालिका सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. शुटींग आणि माझे एका नाटकाचे प्रयोग सुरु असल्याने मला माझ्या सात वर्षांच्या मुलीला आणि कुटुंबाला वेळ देता येत नव्हता. सुरुवातीला हे प्रयोग कमी असायचे त्यामुळे मी नाटकाचे दौरे आणि शूटिंग दोन्ही गोष्टी एकत्र मॅनेज होत होत्या. पण, आता नाटकाला देखील भरपूर प्रतिसाद मिळतोय, प्रयोग वाढलेत. हे सगळं एकत्र सांभाळणं म्हणजे माझ्यासाठी तारेवरची कसरत आहे. म्हणूनच मला मालिका सोडण्याचा हा जड निर्णय घ्यावा लागत आहे. यासाठी मला ‘ठरलं तर मग’च्या टीमने सुद्धा सकारात्मक पाठिंबा दिला, मला नीट समजून घेतलं.”याशिवाय सेटवर खूप हेल्दी वातावरण असतं, त्यामुळे मी सर्वांना मिस करणार असंही केतकीने या मुलाखतीत सांगितलं. सगळ्यांच्या टीमवर्कमुळे आज मालिकेला एवढं मोठं यश मिळतंय असंही ती म्हणाली. आता केतकीच्या जागी मालिकेत कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Veen Doghantli Hi Tute Na : समर-स्वानंदीच्या आयुष्यात आली आणि १५ दिवसांतच गेली! Purva Gokhale ची पोस्ट चर्चेत

 

Web Title: Tharala tar mag fame sakshi actress ketki palav exits from tharala tar mag serial

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 01:23 PM

Topics:  

  • star pravah serial
  • tharla tar mag

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.