Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaishali Samant: वैशाली सामंतच्या भावस्पर्शी स्वरांनी सजलं ‘उभी तुझ्या गाभारी मंगेशा’; श्रावणासाठी खास भक्तिगीत

Vaishali Samant: सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या स्वरातील ‘उभी तुझ्या गाभारी मंगेशा’ हे श्रावण स्पेशल भक्तिगीत ‘सप्तसूर म्युझिक’च्या युट्यूब चॅनेलवर रिलीज झालं आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 21, 2026 | 10:33 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Vaishali Samant: श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वावर भक्ती, संगीत आणि अध्यात्माचा सुरेल संगम घडवणारं ‘उभी तुझ्या गाभारी मंगेशा’ हे नवं भक्तिगीत रसिकांच्या भेटीला आलं आहे. सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या मधुर आणि भावस्पर्शी आवाजाने सजलेलं हे गाणं ‘सप्तसूर म्युझिक’च्या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

श्री मंगेशाच्या चरणी लीन होणाऱ्या भक्ताच्या भावविश्वाचं दर्शन या गाण्यातून घडतं. “सर्व सुखांची प्रचिती घडली, घडला साक्षात्कार… उभी तुझ्या गाभारी मंगेशा, हरपून देहभान” या भावपूर्ण शब्दांतून श्री मंगेशाच्या सान्निध्यात भक्ताला मिळणारी आध्यात्मिक अनुभूती, समाधान आणि भक्तिभाव प्रभावीपणे व्यक्त करण्यात आला आहे.

वैशाली सामंत यांच्या आवाजाने सजलं भक्तिगीत

‘उभी तुझ्या गाभारी मंगेशा’ या गाण्याची निर्मिती साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांनी केली असून, गीतलेखन साई दळवी यांनी केलं आहे. प्रणव हरिदास यांनी गाण्याला संगीत दिलं असून संगीत संयोजनाची जबाबदारीही त्यांनीच सांभाळली आहे.

महाराष्ट्राच्या लोकप्रिय गायिका वैशाली सामंत यांच्या आवाजाने या भक्तिगीताला विशेष भावस्पर्शी रंग मिळाला आहे. त्यांच्या स्वरातील भक्तिभाव आणि ताकद गाण्याचा आध्यात्मिक प्रभाव अधिक वाढवते.

अनेक गुणी कलाकारांची सुरेल साथ

गाण्याच्या ताल संयोजन आणि रिदम प्रोग्रामिंगची जबाबदारी सौरभ शिर्के यांनी सांभाळली आहे. प्रणव हरिदास यांनी बासरीवादन केलं असून, व्हायोलिन सेक्शनमध्ये नेविल फ्रँको आणि समूह यांचा सहभाग आहे. अभिजीत मझुमदार, प्रिन्स दविड आणि धर्मेंद्र जावडा यांनीही व्हायोलिनची साथ दिली आहे.

व्हियोला वादन जितेंद्र जावडा आणि संदीप ठाकूर यांनी केलं आहे. कोरसमध्ये निधी रानडे, शार्दुल कवठेकर आणि कार्तिक लेले सहभागी झाले आहेत. ध्वनी मिश्रण आणि ध्वनी मुद्रणाची जबाबदारी अवधुत वाडकर (Ajivasan Sounds) यांनी सांभाळली असून, क्यू व्हॉइस शार्दुल कवठेकर यांचा आहे.

‘सप्तसूर म्युझिक’ची भक्तिसंगीताला सुरेल भेट

साईनाथ राजाध्यक्ष यांचं ‘सप्तसूर म्युझिक’ संगीताच्या विविध प्रकारांना आणि नव्या प्रयोगांना व्यासपीठ देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रेमगीतांपासून भक्तिगीतांपर्यंत, पारंपरिक संगीतापासून आधुनिक संगीतप्रयोगांपर्यंत विविध धाटणीची गाणी या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवली जात आहेत.

याच संगीतप्रवासात श्रावण महिन्याच्या निमित्ताने पंडित जयतीर्थ मेवुंडी, जे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य आहेत, यांचा ‘उठ आता मंगेशा’ हा भैरवी आणि भूप रागाचा प्रभाव असलेला अभंगही सादर करण्यात आला आहे. त्यानंतर श्री मंगेशाच्या चरणी अर्पण केलेलं ‘उभी तुझ्या गाभारी मंगेशा’ हे भक्तिगीत या संगीतप्रवासातील आणखी एक सुंदर भर ठरलं आहे.

Rucha Gaikwad Engagement: थाटात पार पडला ऋचा गायकवाड आणि प्रथमेशचा साखरपुडा; अभिनेत्रीचा लूक चर्चेत, फोटो व्हायरल

वैशाली सामंत यांच्या स्वरांची जादू, भावपूर्ण शब्दरचना आणि गुणी कलाकारांची सुरेल साथ यामुळे ‘उभी तुझ्या गाभारी मंगेशा’ हे गाणं श्रावणातील रसिकांसाठी एक भक्तिमय आणि अविस्मरणीय संगीतानुभव ठरण्याची अपेक्षा आहे.

‘उभी तुझ्या गाभारी मंगेशा’ हे भक्तिगीत ‘सप्तसूर म्युझिक’च्या युट्यूब चॅनेलवर ऐकण्यासाठी उपलब्ध आहे. श्रावणाच्या या पवित्र महिन्यात श्री मंगेशाच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक होण्यासाठी हे सुरेल भक्तिगीत नक्की ऐका.

The Traitors 2: मोठा ट्विस्ट! एक ट्रेटर अन् ३ इनोसेंट्सचा गेम ओव्हर; चार दमदार स्पर्धकांची शोमधून एक्झिट

Web Title: Vaishali samant new song ubhi tuzya gabhari mangesha released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 10:33 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • New Song

संबंधित बातम्या

Bhai Khulawalo Song: मालवणी ठसका अन् कोकणी-गोवन संगीताचा तडका; नितीश-रुचिराचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
1

Bhai Khulawalo Song: मालवणी ठसका अन् कोकणी-गोवन संगीताचा तडका; नितीश-रुचिराचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Afratafri Marathi Movie: ग्लॅमर, मस्ती आणि भन्नाट ठेका! ‘अफरातफरी’मधील ‘होऊन जाऊ दे’ गाणं रिलीज
2

Afratafri Marathi Movie: ग्लॅमर, मस्ती आणि भन्नाट ठेका! ‘अफरातफरी’मधील ‘होऊन जाऊ दे’ गाणं रिलीज

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
3

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित
4

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.