Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vidyutjiva in Ramayana: रामायणातील ‘विद्युतजीव’ कोण? ‘या’ रहस्यमय पात्राबद्दल जाणून घ्या खास गोष्टी; विवेक ओबेरॉय साकारणार भूमिका

Vidyutjiva in Ramayana: रामायणातील विद्युतजीव कोण होता? रावणाशी त्याचं नातं काय होतं? नितेश तिवारी यांच्या 'रामायणम'मध्ये विवेक ओबेरॉय साकारणाऱ्या या रहस्यमय पात्राबद्दल जाणून घ्या.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 31, 2026 | 10:39 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Vidyutjiva in Ramayana: नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायणम’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून तो सातत्याने चर्चेत आहे. रणबीर कपूर, यश, साई पल्लवी आणि लारा दत्ता यांच्यासह अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. ट्रेलरमध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय याची ‘विद्युतजीव’ या पात्रातील झलकही पाहायला मिळाली आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, विद्युतजीव(Vidyutjiva )कोण होता? त्याचा रावणाशी काय संबंध होता? आणि रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मध्ये हे पात्र का दाखवण्यात आले नव्हते?

कोण होता विद्युतजीव?

पौराणिक कथांनुसार, विद्युतजीव हा रावणाची बहीण शूर्पणखा हिचा पती होता. त्यामुळे तो रावणाचा मेहुणा मानला जातो. तो कालकेयांचा सेनापती आणि पराक्रमी राक्षस योद्धा होता. शूर्पणखाने रावणाच्या इच्छेविरुद्ध जाऊन त्याच्याशी गुप्तपणे विवाह केला होता.

कथेनुसार, रावणाला ही गोष्ट समजल्यानंतर कालकेयांशी झालेल्या युद्धात त्याने विद्युतजीवाचा वध केला. पतीच्या मृत्यूनंतर शूर्पणखा दुःखात बुडाली आणि पुढे वनात प्रभू रामांची भेट झाल्यानंतर रामायणातील पुढील घटनांना सुरुवात झाली. अनेक पौराणिक कथांमध्ये शूर्पणखेच्या माध्यमातूनच रावणाला सीतेच्या सौंदर्याची माहिती मिळाल्याचा उल्लेख आढळतो.

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मध्ये हे पात्र का नव्हतं?

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत कथानकाचा केंद्रबिंदू राम, सीता, लक्ष्मण आणि रावण यांच्याभोवती ठेवण्यात आला होता. त्यामुळे शूर्पणखेच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित विद्युतजीव या पात्राचा समावेश करण्यात आला नव्हता. मालिकेत थेट शूर्पणखेची राम-लक्ष्मण यांच्याशी झालेली भेट आणि त्यानंतर घडणाऱ्या घटनांवर भर देण्यात आला होता.

Ramayana Star Cast : ‘रामायण’मध्ये भगवान विष्णूंच्या भूमिकेत कोण? महेश बाबू-राजामौलींच्या ‘वाराणसी’शी काय आहे खास कनेक्शन?

विवेक ओबेरॉय साकारणार महत्त्वाची भूमिका

नितेश तिवारी यांच्या ‘रामायणम’मध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय विद्युतजीवची भूमिका साकारत आहे.(Vidyutjiva in Ramayana) ट्रेलरमधील त्यांच्या झलकनंतर या पात्राविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. चित्रपटात विद्युतजीवच्या माध्यमातून शूर्पणखेच्या आयुष्यातील आणि रामायणातील काही कमी परिचित पैलू उलगडले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Ramayana Star Cast : ‘रामायण’मध्ये भगवान विष्णूंच्या भूमिकेत कोण? महेश बाबू-राजामौलींच्या ‘वाराणसी’शी काय आहे खास कनेक्शन?

रकुल प्रीत सिंग विरुद्ध रेणू धारीवाल

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मध्ये रेणू धारीवाल यांनी साकारलेली शूर्पणखेची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. तर नितेश तिवारी यांच्या ‘रामायणम’मध्ये ही भूमिका रकुल प्रीत सिंग साकारत आहे. त्यामुळे दोघींच्या अभिनयाची तुलना होणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Vidyutjiva in ramayana vivek oberoi role

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 10:39 AM

Topics:  

  • bollywood Flim
  • ranbir kapoor
  • vivek oberoi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.