
फोटो सौजन्य - Social Media
सिनेमात Lyari नावाचे छोटे शहर दाखवण्यात आले आहे, जिथे एकेकाळी पाकिस्तानचे Underworld वसले होते. हे शहर खऱ्या आयुष्यातही कराचीजवळ स्थित आहे. पण शूटिंगमध्ये दाखवण्यात आलेले Lyari हे थायलंडमधील Bangkok आहे. तर Dhurandhar 2 चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवण्यात आलेले Jaskirat Singh Rangi चे भारतातील पंजाबचे गाव हे खऱ्या आयुष्यातही भारतातील पंजाबमध्येच स्थित असून shooting खेरा गाव येथे झाली आहे.
सिनेमातील प्रचंड चर्चेत असलेले गाणे ‘Gehra Hua’ चे शूटिंग पाकिस्तानमध्ये झालेले नसून भारतात Leh Ladakh येथे झाले आहे. तर सिनेमात दाखवण्यात आलेले Rehman Dakait चे घर Lyari येथे स्थित नसून ते अमृतसरमध्ये स्थित आहे. तर सिनेमाची बरीच शूटिंग मुंबईच्या प्रसिद्ध मढ आयलँडमध्ये झाली आहे. तर वाचून आश्चर्य बसेल. धुरंधरच्या पहिल्या भागात Rehman Dakait ला जेव्हा SP Aslam एका पुलावर पोलिसांची तुकडी बसवून पकडून आणतो, ते पूल Lyari मध्ये नसून डोंबिवलीच्या अगदी शेजारी असलेल्या माणकोली येथे स्थित आहे. तर तसेच मुंबईतील Golden Tobacco Factory आणि नवी मुंबई येथे स्थित असलेले लोकमत भवन येथे धुरंधर चित्रपटातील काही महत्वाचे दृश्य shoot करण्यात आले आहेत.
एकंदरीत, गोष्ट जरी पाकिस्तानातील ठिकाणावर आधारित असली तरी चित्रपटाची Shooting ही भारतातच झाली आहे आणि काही भाग परदेशात Shoot करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे सिनेमामध्ये वापरण्यात आलेले VFX, दाखवण्यात आलेली संस्कृती आणि भाषेने, अगदी डोंबिवलीच्या माणकोली-पुलालाही Lyari चा अस्सल फील दिला आहे.