फोटो सौजन्य - Social Media
भांडण संपल्यावर बिग बॉसने या शिक्षा सुनावल्या पण तत्पूर्वी त्यांनी हे ही सांगितलं की “आम्ही फुटेज पहिल्या आहेत आणि निदर्शना आले आहे की धक्काबुक्की करण्याची सुरुवात विशालने केली आहे.” याचार्थ धक्काबुक्की करण्याची सुरुवात विशालकडून झाली आहे राकेशने फक्त पलटवार केला आहे, हे सिद्ध होते. यावर सोशल मीडियावर विविध कलाकारांनी आपली मतं मांडली आहेत. तर चाहत्यांनी त्यांच्या आवडत्या कलाकारांना पाठिंबा दिला आहे.
मराठी कलाकारांमध्ये अभिनेत्री रुपाली भोसलेने या संपूर्ण प्रकरणावर इंस्टाग्राम पोस्टच केली आहे. तिने थेट बिग बॉसने घेतलेल्या निर्णयावर आणि दिलेल्या शिक्षेवर बोट ठेवला आहे. तिच्या पोस्टमधून तिला बिग बॉसने विशालला दिलेली शिक्षा पटलेली नसल्याचे दिसून येत आहे.
नेमकं काय लिहलंय पोस्टमध्ये?
रुपालीने पोस्टमध्ये लिहले आहे की , “बिग बॉस म्हणजे नेमकं काय चाललंय? कोणी अटॅक करायला अंगावर आला तर काय करायचं? शांतपणे उभं राहायचं आणि मार खायचा का? आणि काय निर्णय दिला ‘संपूर्ण सीझन नॉमिनेट केलं आणि कॅप्टनसी काढली, बस्स?’ त्याला घरातून बाहेर का नाही काढलं? त्याने कॉन्ट्रॅक्टचा नियम तोडला तरी तुम्ही काहीच केलं नाही? विशाल आणि त्याच्या टोलीने याआधीही असं केलं आहे. नॉमिनेशनची चर्चा असो किंवा कोणाला नॉमिनेट करायचं हेही आम्हाला दिसलं होतं. टास्कमध्येही तेच झालं, पण तेव्हाही काहीच कारवाई झाली नाही. विशाल, खरंच तुला अहंकार आहे. त्याला गर्व किंवा अभिमान असं नाव देऊ नकोस. खरंच, तू कमजोर आहेस.”
रुपाली भोसलेला बिग बॉसने दिलेला निर्णय यावर आक्षेप आहे तसेच तिचे म्हणणे आहे की “विशालची चूक गंभीर आहे तर त्याला मिळालेली शिक्षा इतकी किरकोळ का?” तसेच रुपालीने विशालला गर्विष्ठ म्हणत तो कमजोर असल्याचेही सांगितले आहे.






