फोटो सौजन्य - Social Media
आताच्या आकलमध्ये वजन वाढणे फार सामान्य झाले आहे. बहुतेक जण या समस्येला तोंड देत आहेत. अनेक जण यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हालचाल करत आहेत, तर अनेक जण यावर दुर्लक्ष करत आहेत. बाजारात नवनवीन आणि चमचमीत खाद्यपदार्थ येत आहेत, ते पाहून खवय्यांचे मोह काही आवरेना. अशामध्ये चवीच्या मोहापायी अनेक जणांनी आरोग्याचा विचार करणे सोडून दिले आहे. त्यामध्ये बैठी नोकरी असेल तर वेगळे दुःख आहेत. दिवसभर ८ ते ९ तास सलग एका ठिकाणी बसून वजन वाढणे आणि चरबी वाढीचे समस्या अनेकांना उद्भवत आहेत. बहुतेक जण या समस्यांना झुंज देत आहेत. अशा परिस्थितीमध्ये अनेक जण आहेत, ज्यांना वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचे आहे, परंतु त्यांना त्यांच्या व्यस्थ जीवनशैलीतून स्वतःसाठी वेळ काढणे कठीण झाले आहे.
जर तुम्ही वाढत्या वजनाने आणि पोटामध्ये अतिरिक्त चरबी वाढीने त्रासले आहात तर वेळीच सावध व्हा. यावर आता नियंत्रण ठेवता आले नाही तर कदाचित भविष्यामध्ये तुम्हाला अनेक त्रासाला सामोरे जाण्याची शक्यता उद्भवू शकते. वाढत्या वजनाच्या आणि शरीरातील अतिरिक्त चरबी अनेक आजारांना खुले आमंत्रण देते. हे आमंत्रण टाळण्यासाठी वेळीच पावले उचलणे आवशयक असते.
पोटामध्ये वाढणारी चरबी शरीरातील शर्करेशी खेळते. याच्यामुळे, मधुमेहासारखा आजार शरीरात जन्म घेतो. या आजाराला शक्यतो अंत नसतो. हा आजार एकदा झाला कि तो आयुष्यभराचा साथीदार होतो. देशामध्ये १०१ मिलियन लोकं या आजाराने त्रासले आहेत. या आजाराला बळी पडणारे बहुतेक लोकांना लठ्ठपणाचा विकार आहे. शरीरातील अतिरिक्त चरबीमध्ये नियमित वाढ हृदयविकाराच्या संबंधित आजारांना जन्म देतो. कमरेच्या सभोवताली जमलेली चरबी हृदयाकडे पोषण देणे थांबवते, परिणामी हृदयसंबंधित आजार वाढतात.
१५ वर्षे ते ५४ वर्षे वय असलेल्या लोकांमध्ये ब्लड प्रेशरची समस्या वाढत आहे. यातील ३४.१% रुग्ण लठ्ठपणाने त्रस्त असल्यामुळे त्यांना उच्च रामदाबाचा त्रास आहे. शरीराचा लठ्ठपणा पोटाच्या आत दाब वाढणे, हार्मोनल असंतुलन, मज्जासंस्थेची वाढलेली क्रिया, जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव यासारख्या गोष्टींना वाढीस लावतात. या गोष्टी रोकण्यासाठी वाढत्या वजनेवर नियंत्रण ठेवणे फार महत्वाचे आहे.