श्री श्री रवि शंकर यांनी दिल्या आरोग्याबाबत टिप्स
निरोगी राहणे म्हणजे केवळ आजारांपासून दूर राहणे नव्हे. त्याऐवजी, हा जीवन जगण्याचा एक मार्ग आहे जो आपण किती आनंदी, प्रेमळ आणि उत्साही आहात हे प्रतिबिंबित करतो असे श्री श्री रविशंकर यांनी आरोग्यावर आपले मत मांडले आहे. श्री श्री रविशंकर यांनी दीर्घ, निरोगी आणि तंदुरुस्त आयुष्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
मधुमेह, उच्च रक्तदाब, नैराश्य आणि चिंताग्रस्त रुग्ण किंवा अगदी तंदुरुस्त व्यक्ती या टिप्सचे पालन करून आरामदायी आणि आनंदी जीवन जगू शकतात. तसंच तुम्ही अनेक आजारांपासून दूरही राहू शकता. जाणून घ्या अधिक माहिती (फोटो सौजन्य – Instagram/iStock)
प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटची गरज
एका व्हिडिओमध्ये श्री श्री रविशंकर यांनी आहार आणि पोषणाद्वारे फिटनेस वाढवण्याचे मार्ग सांगितले आहेत. ते म्हणाले की, ‘आपल्या शिक्षण व्यवस्थेत हे शिकवले जाते की नाही माहीत नाही, पण मुलांना पोषणाची माहिती असली पाहिजे. प्रथिने, कार्ब किंवा इतर पोषणाची गरज किंवा कार्य काय आहे हे मुलांना चांगल्या पद्धतीने माहीत करून दिले पाहिजे. आपण काय आणि किती खावे हे त्यांना कळले पाहिजे.
सांगितल्या आजीच्या टिप्स
संपूर्ण आहार महत्त्वाचा
श्री श्री रविशंकर यांनी सांगितले की त्यांची आजी जेवणात नेहमी पालक बनवायची. तर आहारात नियमित वेगवेगळ्या हिरव्या पालेभाज्यांचा समावेशही करण्यात येत होता. एकादशीचे व्रत करण्यापासून ते अगदी तिखट चवीची पाने, कारले आणि अनेक आरोग्यदायी भाज्या त्यांनी आजीमुळे लहानपणापासून खाल्ल्या आहेत. त्यांच्या आजीच्या आहारात दही, कोशिंबीर आणि डाळ यांचा नियमित समावेश होता, ज्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास अधिक मदत झाली.
केळ्याच्या पानाचे महत्त्व
अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी केळीच्या पानांवर खाण्याचे फायदेदेखील यामध्ये सांगितले आहेत. ही सवय दृष्टीसाठी चांगली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. केळीच्या पानावर जेवण वाढण्याची एक पद्धत आहे, ज्यामध्ये उजव्या हाताला वरच्या बाजूला मीठ ठेवले जाते आणि त्याखाली कोशिंबीर आणि हंगामातील आरोग्याला पोषक ठरणाऱ्या भाज्या वाढल्या जातात. संपूर्ण जेवणामध्ये 12-13 खाद्यपदार्थांचे लहान लहान भाग असतात, जे संपूर्ण संतुलित आहार बनवतात.
हेदेखील वाचा – इंटरमिटेंट फास्टिंग की किटो डाएट, Weight Loss साठी काय करावे फॉलो
केळ्याच्या पानावर जेवणाचे फायदे
केळीच्या पानावर जेवण्याचे आरोग्यदायी फायदे
केळ्याच्या पानावर जेवल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. यामध्ये कॅल्शियम, विटामिन ए, सी आणि टॅनिनचा भरणा असतो. शरीरातील प्रतिकारशक्ती वाढून ताप, सर्दी खोकल्यापासून दूर राहता येते. तसंच अनेक आजारांपासून दूर राहू शकता. याशिवाय रक्तदाबाचा त्रासही कमी होतो. केळीच्या पानांवर खाल्ल्यामुळे त्यातील पदार्थांमध्ये पॉलीफेनॉल मिसळून पौष्टिक मूल्य वाढते आणि शरीराला फायदा मिळतो.
कसे असावे डाएट
डाएटमध्ये नेमके काय असावे
श्री श्री रविशंकर यांच्या मते, तुम्ही योग्य प्रमाणात योग्य अन्न खावे ज्यामुळे आरोग्य निरोगी राहते. शाकाहारी, पौष्टिक आणि पचायला हलका असा आहार घ्यावा. शुद्ध मध, आले, बदाम, बिया आणि ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन तुम्ही आहारात करत आहात की नाही याबाबत खात्री करून घ्या