या लक्षणांना दुर्लक्षित करू नका, महिनाभर आधी आपले डोळे देत असतात हार्ट अटॅकचे भयंकर संकेत
जगभरात असे अनेक आजार आहेत जे आपल्या मृत्यूस कारणीभूत ठरत असतात. यातीलच एक म्हणजे, हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट अटॅक. कार्डियाक अरेस्ट किंवा हृदयाच्या अन्य समस्यांमुळे आपले शरीर मृत्यूकडे ओढले जात असते. दरवर्षी हजारो लोक हृदयविकाराच्या झटक्याने आपला जीव गमावत आहेत. हा झटका इतका जोरदार आणि अकस्मात असतो की काही कळण्यापूर्वीच व्यक्तीने आपले प्राण गमावलेले असतात.
परंतु तुम्हाला माहिती आहे का? हार्ट अटॅक हा अकस्मात जरी येत असला तरी याआधी हा आपल्याला अनेक संकेत देत असतो. हृदयातील वेदना हा हार्ट अटॅकचा प्राथमिक संकेत मानला जातो. मात्र याव्यतिरिक्तही आपल्या शरीरात अनेक बदल होत असतात जे आपल्याला या आजाराची ओळख पटवून देत असतात. विशेषतः डोळ्यात दिसून येणारे बदल. डोळ्यांमध्ये दिसणाऱ्या काही लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने धोका वाढू शकत, ज्यामुळे यावर वेळीच योग्य तो उपचार करणे आवश्यक आहे.
डोळ्यांभोवती सूज येणे
सामान्यतः पुरेपूर झोप न मिळाल्याने डोळ्यांभोवती सूज येत असते मात्र तुम्हाला जर ही समस्या वारंवार उद्भवत असेल आणि ही सूज कायम राहत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. डोळ्यांचे असे सतत सुजणे हृदयाचे कार्य नीट न होत असल्याचे संकेत देत असतात. हृदय रक्तप्रवाह योग्य प्रकारे पंप न करू शकल्यामुळे डोळ्यांभोवती द्रव साचतो आणि यामुळे सूज दिसू लागते.
डोळ्यांभोवती पिवळे डाग
डोळ्यांद्वारे दिसून येणारा हार्ट अटॅकचा आणखीन एक संकेत म्हणजे, डोळ्यांच्या भोवती पिवळे डाग दिसून येणे. याकडे अजिबात दुर्लक्षित करू नये. याला “झॅन्थेलाझ्मा” (Xanthelasmas) असे म्हटले जाते. एका अहवालानुसार, हे डाग कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड किंवा अन्य लिपिड्सच्या जास्त प्रमाणाची सूचना देत असतात, जे हृदयविकाराच्या मुख्य कारणांपैकी एक आहे.
डोळे लाल होणे
हृदयविकाराचा धोका वाढतच अनेकदा आपले डोळे लाल होऊ लागतात. हृदयाशी संबंधित रक्तप्रवाहातील अडचणीमुळे डोळ्यांचा पांढरा भाग लाल दिसू लागतो. ही गोष्ट हृदयाच्या कार्यक्षमतेचे गंभीर इशारा देत असतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
2 रुपयांचा हा उपाय चेहऱ्यावरील सर्व ब्लॅकहेड्स करेल दूर, फेशियलचीही गरज भासणार नाही
हार्ट अटॅकची इतर प्रमुख लक्षणे
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.