2 रुपयांचा हा उपाय चेहऱ्यावरील सर्व ब्लॅकहेड्स करेल दूर, फेशियलचीही गरज भासणार नाही
आपला चेहरा हा आपली ओळख असतो. अशात याची योग्य ती काळजी घेणे फार गरजेचे असते. अनेकदा चेहऱ्याची योग्य निगा न राखल्यास चेहऱ्याच्या समस्या उद्भवू लागतात. यातीलच एक समस्या म्हणजे ब्लॅकहेड्स! आपल्या चेहऱ्यावर घाण साचू लागली किंवा चेहरा अस्वच्छ असल्यास ब्लॅकहेड्सची समस्या जाणवू लागते. ही समस्या फक्त महिलांनाच नव्हे तर पुरुषांनाही जाणवू शकते. ही एक सामान्य समस्या आहे, जी वातावरणातील बदलांमुळेही जाणवू शकते. चेहऱ्यावरील हे काळे स्पॉट्स आपल्या चेहऱ्याचे तेज कमी करत असतात. अशात वेळीच त्यांना दूर करणे फायद्याचे ठरेल.
अनेकदा महिला यासाठी पार्लरचा पर्याय निवडतात. मात्र हा एक खर्चिक पर्याय आहे. अशात आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही एका घरगुती उपायाने अगदी सहज आणि अधिक पैसे न खर्च न करता तुमच्या चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करू शकता. सध्या सोशल मीडियावर टिश्यू पेपरच्या मदतीने चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्याचा एक उत्तम उपाय शेअर करण्यात आला आहे. आज आपण या लेखात याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. या उपायाने तुम्ही घरीच स्वस्त आणि सोपा उपाय करून आपल्या त्वचेला सुंदर आणि स्वच्छ बनवू शकता.
टिश्यू पेपर आणि अंड्यापासून तयार करा नोज स्ट्रीप
यासाठी एका वाटीमध्ये अंड्याचा पांढरा भाग वेगळा करून घ्या. मग त्यात तांदळाचे पीठ आणि मुल्तानी माती टाका आणि व्यवस्थित मिसळून याची पेस्ट तयार करा. अंड्याचा पांढरा भाग त्वचेला टाईट करण्यासाठी उपयोगी ठरतो, तर मुल्तानी माती त्वचेला खोलवर स्वच्छ करण्यास मदत करते. आता हे मिश्रण तयार केल्यानंतर ब्लॅकहेड्स असलेल्या भागावर लावा. तुम्ही हे मिश्रण व्हाईटहेड्स दूर करण्यासाठीही वापरू शकता. हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यानंतर त्यावर टिश्यू पेपर ठेवा चिकटवा. टिश्यू पेपर चिकटल्याची खात्री करून घ्या. तुम्ही टिश्यू पेपरची डबल लेअर देखील करू शकता.
आता मिश्रण नीट सुकल्यानंतर यावर चिकटवलेला टिश्यू पेपर हळुवारपणे काढा. असे केल्याने, तुम्हाला चेहऱ्यावरील सर्व ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स टिश्यू पेपरला चिकटून वेगळे झालेले दिसून येतील. हा उपाय नाक आणि चेहरा स्वछ करण्यासाठी प्रभावी ठरतो.
चेहऱ्यावरील टॅनिंग घालवण्यासाठी तांदळाच्या पाण्यात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो
या नैसर्गिक घटकांनी वाढवता येईल परिणाम
आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही या उपायामध्ये काही नैसर्गिक घटकांचा देखील वापर करू शकता. यात दही, मध किंवा गुलाबपाणी यांसारख्या नैसर्गिक वस्तूंचाही समावेश करता येईल. यामुळे त्वचेला नैसर्गिक आर्द्रता मिळते आणि त्वचा अधिक चमकदार होते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.