
धावपळीच्या जगात खराब जीवनशैलीमुळे लठ्ठपणाची समस्या सामान्य झाली आहे. यापासून सुटका म्हणून लोक विविध पद्धतींचा अवलंब करतात. कोणी आहारात बदल करतात, तर कोणी जिममध्ये जातात. काही लोक जेवण करणे ही टाळतात. पण यामुळे शरीरास योग्य पोषकत्त्वे मिळत नाही. मग कमजारी येणे, अंगदुखणे यांसारखे अनेक आजार उद्भवू लागतात. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला अशाच काही स्मूदींबद्दल सांगत आहोत, ज्यामध्ये भरपूर पोषक तत्व असतात. यांच्या नियमित सेवनाने तुमचे महिनाभरात वजनही कमी होण्यास मदत होईल.
मॅजेन्टा स्मूदी
ही स्मूदी बनवण्यासाठी बीटरूट, गाजर, सफरचंद, काकडी, बारीक चिरलेले आलं आवश्यक आहे. ते एकत्र करा आणि त्यात थोडेसे पाणि घालून मिक्सरमध्ये फिरवा. नंतर चवीनुसार मीठ आणि बर्फ घालून तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. बीटरूट आणि गाजरमध्ये भरपूर फायबर असते, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. काकडीत भरपूर पाणी असते, ज्यामुळे तुम्ही हायड्रेट राहता. तसेच आलं तुमचे पचन सुधारण्यास मदत करते.
ग्रीन जूस
हे करण्यासाठी पालकचे देठ, सफरचंद, काकडी, अर्धा चिरलेला लिंबू, सोललेली आणि बारीक चिरलेले आलं मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या. पालक आणि सफरचंद हे फायबरचे चांगले स्त्रोत आहे. जे वजन कमी करण्यास मदत करतात. पाण्याचा चांगला स्रोत असल्याने काकडी तुम्हाला हायड्रेट ठेवते. या स्मूदीमुळेही तुमची पचनक्रिया उत्तम बनते.
ऑरेंज स्मूदी
यासाठी संत्र्याचा रस, गाजर, अननस आणि हळद पावडर घ्या. मिक्सरमध्ये सगळ्याचे तुकडे करुन अर्धा चमचा हळद पाडर व थोडेसे पाणी टाकून बारीक करा. संत्र्याचा रस तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करतो. गाजर आणि अननसमध्ये भरपूर फायबर असल्यामुळे वजन कमी करण्यास मदत करते. हळदीमुळे तुमची पचनसंस्था निरोगी राहते.