फोटो सौजन्य - Social Media
आताच्या काळामध्ये प्रत्येकजण डिप्रेशन या शब्दाला ओळखून आहे. लोकांमध्ये सतत विचार करण्याची सवय इतक्या प्रमाणामध्ये वाढली आहे कि लोकं मानसिक त्रासला सामोरे जात आहेत. या मानसिक त्रासाला अनेक जण कंटाळली आहेत. अशी अनेक प्रकरणे समोर येत असतात, ज्यामध्ये डिप्रेशनमुळे माणसे स्वतःला संपवत आहेत. आपण जर पाहिले तर प्रत्येकाला कसले ना कसले टेन्शन आहे. प्रत्येकाच्या डोईवर कोणत्याना कोणत्या प्रकारचा भार आहे. पण याचा अर्थ असा नाही कि जर तुम्हाला टेन्शन आहे म्हणजे तुम्हाला डिप्रेशन आहे. टेन्शन असणे ही अतिशय सामान्य समस्या आहे, याला डिप्रेशनसारखा मानसिक त्रास म्हणता येणार नाही. येथे कुणाला अभ्यासाचे टेन्शन आहे तर कुणाला कामाचे. कुणाला लग्नाचे टेन्शन आहे तयार कुणाला एखादी गोष्ट न मिळण्याचे.
हे देखील वाचा : तुमच्या खाण्याच्या पाकिटात लपलंय ब्रेस्ट कॅन्सरचं विष, दचकलात? शोधात सापडले जीवघेणे सत्य
एखाद्या गोष्टीचा टेन्शन असणे किंवा एखाद्या गोष्टीमुळे आपल्याला उदासी येणे, या गोष्टी जास्त दीर्घकाळासाठी नसतात. कालांतराने मनातील ही भावना कमी होत जाते. एखादी वेळ अशी येते, जेव्हा त्या गोष्टीची आपल्याला जाणीव असली तरी त्याचा आपल्याला तितका त्रास होत नाही. अशा उदासीला किंवा टेन्शनला डिप्रेशनसोबत जोडणे अर्थहीन आहे. एखादी गोष्ट न मिळण्याने मनामध्ये जागे होणाऱ्या उदासीनतेला अनेक लोकं डिप्रेशन मानत, नसत्या त्या गोष्टी करून घेत आहेत. मुळात, डिप्रेशन ही अतिशय तीव्र समस्या आहे. या समस्येत माणूस पुरणपणे बदलतो.
डिप्रेशन आणि उदासीमध्ये महत्वाचा फरक म्हणजे डिप्रेशन एक प्रकारची उदासीनतेचीच भावना आहे. परंतु, ही उदासीनता दीर्घकाळासाठी असते. मानवाच्या मनावर गंभीर परिणाम करणारी असते. डिप्रेशनमध्ये कशातच रस लागत नाही. कालपर्यंत आपल्याला आवडणऱ्या गोष्टी अचानक आपल्या न आवडत्या होतात. डिप्रेशनमध्ये व्यक्तीला मानसिक, भावनिक तसेच शारीरिक त्रास होतो. एक तर झोप लागत नाही, नाही तर व्यक्ती सतत झोपत असतो. परंतु, सतत झोपूनही शरीर उर्जाहीन असते. या उदासीला संपवण्यासाठी अनेकदा व्यक्ती स्वतःला संपवण्याचा विचार करतो, महत्वाचे म्हणजे तसे प्रयत्नही करतो. व्यक्तीची कार्यक्षमता, विचार करण्याची क्षमता सगळी अगदी थकलेली असते. इतरांसमोर हसत असणारा हा व्यक्ती आतून अगदी विखुरलेला असतो.
हे देखील वाचा : पितृपक्षाच्या नैवेद्यात भाजणीचे वडे खुसखुशीत होण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्स, वडे होतील चविष्ट
जर एखाद्या व्यक्तीला उदासी दीर्घकाळासाठी जाणवत आहे. स्वतःला संपवण्याचे तसेच वरील सगळ्या गोष्टी स्वतःबरोबर घडत आहेत, तर त्याने ताबडतोब मनोपचारतज्ञाशी भेट घालणे फार गरजेचे आहे. अशा गोष्टीनावर वेळीच नियंत्रण ठेवेन कधीही उत्तम असते.