
झिकाच्या रुग्णसंख्येत होतीये मोठी वाढ
भारतातील काही राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. येत्या काही दिवसांत अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसाळ्यात ज्या आजाराचा सर्वाधिक धोका असतो, तो म्हणजे डेंग्यू. त्याची प्रकरणे भारतात दरवर्षी जास्त प्रमाणात आढळतात. काही रुग्णांचा मृत्यूही होतो. सध्या डेंग्यूचा एकही रुग्ण आढळलेला नाही, परंतु याचदरम्यान देशात झिका विषाणूचे दोन रुग्ण आढळून आले आहेत.
ही दोन्ही प्रकरणे पुण्यात सापडली असून डॉक्टर आणि मुलीला झिका व्हायरलची लागण झाली आहे. झिका विषाणू देखील डेंग्यू सारख्या डासांच्या चावण्यामुळे होतो. जरी त्याची प्रकरणे डेंग्यूपेक्षा कमी आहेत, परंतु हा एक धोकादायक आजार देखील आहे.
पावसाळ्यात झिका विषाणूचा प्रसार करणाऱ्या डासांचाही धोका आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. डेंग्यू आणि झिका हे दोन्ही विषाणूजन्य आजार आहेत आणि ते डासांच्या चाव्याव्दारे होतात. परंतु त्यांची लक्षणे आणि शरीराला होणारे नुकसान यामध्ये फरक आहे. अशा परिस्थितीत, या दोन रोगांच्या लक्षणांमधील फरक जाणून घेणे आवश्यक आहे.
तज्ज्ञांच्या म्हण्यानानुसार, झिका विषाणू एडिस अल्बोपिक्टस डासाच्या चाव्याव्दारे पसरतो. हा आजार संसर्गजन्य आहे. म्हणजेच हा आजार एका रुग्णाकडून दुसऱ्या रुग्णात पसरतो. झिका संसर्ग कोणालाही होऊ शकतो. जर तो संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आला तर व्हायरस पसरतो. झिका हा एक प्रकारचा आरएनए विषाणू आहे आणि तो गर्भवती मातेकडून तिच्या बाळाला नाभीसंबधीद्वारे जाऊ शकतो. झिका विषाणू रक्ताच्या संसर्गाद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो.