अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाच्या ११२ वैमानिक का मागितली होती अचानक सुट्टी? समोर आलं मोठं कारण
अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाईट AI-171 चा 12 जून रोजी अपघात झाला होता. या भीषण दुर्घटनेत 260 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातान् 112 पायलटस आजाराचं कारण देत रजेवर गेले होते आणि आताही त्यात वाढ झालेली आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे राज्यमंत्री मुरलीधर मोहोल यांनी आज संसदेत दिली.
खासदार जय प्रकाश यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना मोहोल यांनी सांगितले की, अपघाताच्या चार दिवसांनी म्हणजेच 16 जून रोजी, एकूण 112 पायलटनी आजारी असल्याचे सांगत रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. यामध्ये 51 कमांडर्स (PI) आणि 61 फर्स्ट ऑफिसर्स (P2) यांचा समावेश आहे. या सामूहिक निर्णयामागे अपघातानंतर निर्माण झालेला मानसिक ताण हा मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे.
एअर इंडियाच्या या उपघातग्रस्त विमानातील 241 प्रवाशांपैकी केवळ एकच प्रवासी वाचला होता. उर्वरित सर्वांचा मृत्यू झाला, शिवाय विमान जिथे कोसळलं त्या हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या अपघातात ब्रिटन व कॅनडाचे नागरिकही मृत्युमुखी पडले.
प्राथमिक तपासणीत असे निष्पन्न झाले की, टेक-ऑफ झाल्यानंतर काही सेकंदातच इंजिनला इंधन पुरवणारे स्विच ‘कट-ऑफ’ मोडमध्ये गेले होते, ज्यामुळे इंजिनमध्ये फ्युएल पोहोचणे थांबले आणि विमान कोसळले. मात्र हे स्विच नेमके कसे बंद झाले, याचा थेट खुलासा अद्याप झालेला नाही.
या पार्श्वभूमीवर नागरी उड्डाण महासंचालनालयाने (DGCA) सर्व विमान कंपन्यांना एक परिपत्रक जारी करत फ्लाईट क्रू आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलर्सच्या मानसिक आरोग्याचं मूल्यमापन करण्याचे निर्देश दिले. यासोबतच, मानसिक ताणातून निर्माण होणाऱ्या अडचणी ओळखण्यासाठी आणि त्या दूर करण्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
मंत्री मोहोळ यांनी याबाबत पुढे सांगितले की, DGCA ने ऑपरेटर्स, फ्लाइट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन्स (FTO) आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी सपोर्ट प्रोग्राम तयार करण्यास सांगितले आहे. अशा उपक्रमांमुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांची लवकर ओळख होईल आणि त्यावर प्रभावीपणे उपाय करता येईल.