Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Awas Yojana : महाराष्ट्राला २० लाख घरं मिळणार; पंतप्रधान आवास योजनेतील या जाचक अटीही हटवल्या

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरिबांसाठी 19 लाख 66 हजार घरे यावर्षी देण्यात येणार असल्याची घोषणा भारताचे कृषी मंत्री आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Dec 23, 2024 | 10:01 PM
महाराष्ट्राला २० लाख घरं मिळणार; पंतप्रधान आवास योजनेतील या जाचट अटीही हटवल्या

महाराष्ट्राला २० लाख घरं मिळणार; पंतप्रधान आवास योजनेतील या जाचट अटीही हटवल्या

Follow Us
Close
Follow Us:

पंतप्रधान आवास योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ग्रामीण भागातील गरिबांसाठी मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरिबांसाठी 19 लाख 66 हजार घरे यावर्षी देण्यात येणार असल्याची घोषणा भारताचे कृषी मंत्री आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे. किसान सन्मान दिवस 2024 निमित्ताने पुण्यातील केंद्र सरकारच्या कृषी विज्ञान केंद्रात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

यावेळी  शिवराज सिंग चौहान म्हणाले, शरद पवार कृषीमंत्री असताना 23 हजार बजेट होतं ते आता 1 लाख 27 हजार करोड करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे परंतू शेतीची प्रत देखील पुढील पिढीसाठी चांगली राहिली पाहिजे. मी ग्रामविकास मंत्री देखील आहे. त्यामुळे प्रत्येक गरिबाकडे स्वतःचं पक्क घर असलं पाहिजे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आमचा प्रयत्न आहे. तिसऱ्यांदा मोदी सरकार निवडून आले आहे. यापूर्वी 6 लाखापेक्षा अधिक लोकांना घर मिळाली होती. आता 13 लाख 29 हजार महाराष्ट्रातील गरिबांना घरे मिळणार आहेत. महाराष्ट्राला जवळपास वीस लाख घरे आपल्याला मिळालेली आहेत. पुढील एका वर्षांत ही घरं देण्याचा प्रयत्न असेल. ज्यांना यापूर्वी घर मिळाली नाहीत. त्या सर्वांना स्वतःचे घर मिळणार आहे. ज्यांच्याकडे 2 चाकी वाहन आहे, त्यांनाही प्रधानमंत्री आवास योजनेतून घरं मिळणार आहेत.

कार्यक्रमावेळी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान बोलताना म्हणाले, माझा महाराष्ट्राशी सखोल संबंध आहे. मी महाराष्ट्राचा जावई आहे. मी ग्रामीण विकास मंत्री देखील आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण गरीबांसाठी 19 लाख 66 हजार घरे यावर्षी देण्यात येणार आहेत. देशातील कोणत्याही राज्याला मिळालेल्या राज्यापेक्षा ही संख्या जास्त आहे. आतापर्यंत एका राज्याला एका वर्षात मिळालेली ही सर्वाधिक घरे आहेत अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.

शिवराज सिंह चौहान यांनी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मधील महत्त्वाच्या अटी शिथील करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील ज्या कुटुंबाकडे दुचाकी, मोटार नियंत्रित मासेमारीची बोट, लँडलाईन फोन आणि फ्रीज असेल त्यांना आता या योजनेचा लाभ घेता येणार आहे. याशिवाय ज्या कुटुंबातील एखाद्याचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा कमी असेल त्यांना देखील अर्ज करता येईल. यापूर्वी ही अट 10 हजार रुपये उत्पन्न एवढी होती.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने साडेसहा लाख घरं मंजूर केली होती, ते टार्गेट वाढवण्यात आलं आहे. अतिरिक्त 13 लाख घरा आपल्याला देण्यात आलेली आहे. एकूण आपण विचार केला तर जवळपास यावर्षी केंद्र सरकारच्या वतीने महाराष्ट्रातल्या गरिबांकरता, कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता बेघरांकरता एका वर्षात वीस लाख घर देण्याची घोषणा आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलेली आहे महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली अत्यंत मोठी भेट आहे. महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे, कोणत्याही राज्याला आत्तापर्यंत इतक्या संख्येने घरे मिळालेली नाही, जवळपास वीस लाख घरे आपल्याला मिळालेली आहेत. आवास प्लसमध्ये 26 लाख लोकांचं रजिस्ट्रेशन आहे. आता ही वीस लाख घरे मिळाल्याने अनेकांना घरे मिळणार आहेत, त्याचबरोबर पूर्वी जे निकष होते, त्यातील काही निकष हे शिथील करण्यात आले आहेत, ज्यांची नावे सुटली होती, जे खरे बेघर आहेत, अशा सर्वांना नव्या सर्वेक्षणात घरे देण्यात येतील, पुढील पाच वर्षांमध्ये सर्व बेघरांना घरे देण्याचा निर्णय मोदींनी घेतला आहे. इतक्या संख्येने राज्याला घरे देण्याच्या निर्णयावर फडणवीसांनी मोदींचे आणि चौहान यांचे आभार मानले आहेत.

Web Title: 1900066 thousand houses will be provided in rural maharashtra during one year in pm awas yojana shivraj singh chouhan announce

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2024 | 08:49 PM

Topics:  

  • PM Awas Yojana news

संबंधित बातम्या

Gharkul Scheme : राज्यात ३४ लाख कुटुंबांनाकडे पक्की घरे नाहीत; १३ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बेघर कुटुंबे
1

Gharkul Scheme : राज्यात ३४ लाख कुटुंबांनाकडे पक्की घरे नाहीत; १३ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बेघर कुटुंबे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.