Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुगल मॅपमुळे दोन डॉक्टरांचा मृत्यू, चुकीच्या रस्त्यानं गाडी नेत घुसवली थेट नदीत!

गुगल मॅप पाहताना कार चालवताना झालेल्या चुकीमुळे केरळमध्ये दोन डॉक्टरांचा मृत्यू झाला. त्यांची कार नदीत पडली होती. ड्रायव्हरने चुकून नदीला पुराचा रस्ता समजला होता.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Oct 03, 2023 | 03:36 PM
google map

google map

Follow Us
Close
Follow Us:

कोची :  आजकाल प्रवासादरम्यान गुगल मॅप (Google map) वापरणं खूप सामान्य झालं आहे. आता आपण कमी असो की जास्त पत्ता निट नसेल माहित तर गुगल मॅपची मदत घेतो. परंतु अनेक वेळा तंत्रज्ञानावर जास्त अवलंबून राहिल्याने आपल्याला फायदा होण्यापेक्षा त्रास होऊ शकतो. असाच प्रकार केरळमधील दोन डॉक्टरांच्या बाबतीत घडला. गुगल मॅपमुळे त्यांना जीव गमवावा लागला () आहे. गुगल मॅपच्या साहाय्याने जातान रस्ता चुकल्याने गाडी थेट घुसली त्यामुळे नदीत बुडाल्याने दोन्ही डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहेत.

मुसळधार पावसामुळे रस्ता दिसला नाही

मिळालेल्या माहितीनुसार,  29 वर्षीय अद्वैत आणि 29 वर्षीय अजमल हे दोन्ही डॅाक्टर मित्र खासगी रुग्णालयात काम करत होते. हे दोघेही कोची येथील ते कोडुंगल्लूरहून त्यांच्या इतर मित्रांसोबत पार्टी करुन परतत होते. यादरम्यान मुसळधार पाऊस पडत होता. त्यांचा मार्ग चुकू नये म्हणून ते गुगल मॅप वापरत होते.  कार चालवणाऱ्या व्यक्तीला नदीला पाणी साचलेला रस्ता समजला. त्याने कार पुढे ढकलली, त्यामुळे कार नदीत पडली आणि बुडू लागली. अद्वैत आणि अजमल वेळेत गाडीतून बाहेर पडू शकले नाहीत. तीन जण बाहेर येण्यात यशस्वी झाले, त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.

तीन जणांचा जीव वाचला

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना बचावकार्य करण्यासाठी कळवण्यात आले. मृतदेह बाहेर काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी स्कूबा डायव्हिंग टीमही घटनास्थळी पाठवली. अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक लोकांच्या मदतीने गाडीतून बाहेर पडलेल्या तिघांचे प्राण वाचले.

मुसळधार पावसामुळे दृश्यमानता खूपच कमी असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुगल मॅपने दाखवलेल्या मार्गावर ते गाडी चालवत होते, पण  मॅपने सांगितल्याप्रमाणे डावीकडे वळण्याऐवजी ते चुकून पुढे गेले आणि नदीत पडले असं प्रथमदर्शनी दिसत आहे.

Web Title: 2 kerala doctors die as car falls into river were using google map amid heavy rain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2023 | 03:36 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.