देशात गेल्या काही दिवसापासून कोरोनानं (Corona Update India) डोकं वर काढल्याचं दिसत आहे. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थाना इथं कोरोनाचे रुग्ण आढळले. आता दिवसागणिक देशातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. देशात गेल्या 24 तासांत 600 हून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.तर, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा चार हजारांच्या पुढे गेला आहे.
[read_also content=”पेटीएमने 1000 कर्मचार्यांना दिलं नारळ, खर्चात 15% कपात करण्यासाठी कामावरुन काढलं! https://www.navarashtra.com/india/paytm-fires-1000-employees-as-it-aims-to-save-15-percent-of-staff-costs-nrps-492127.html”]
देशात दिवसेंदिवस होणारी कोरोना वाढ प्रशासनाच्या चिंतेत भर घालणारी आहे. त्यात कोरोनाच्या नव्या JN.1 सब-व्हेरियंटमुळे धोका अधिक आहे. नवीन व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.देशात कोरोना व्हायरसचे 628 नवीन रुग्ण सापडले आहेत. यातील बहुतेक रुग्ण नव्या JN.1 सब-व्हेरियंटचे असल्याचं समोर आलं आहे. तर गेल्या 24 तासांत देशात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे दोन्ही रुग्ण कर्नाटकातील असल्याची महिती समोर आली आहे.
गेल्या 24 तासांत दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना महामारी सुरु झाल्यापासून आतापर्यंतच्या बळींचा आकडा पाच लाखांच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत एकूण 5,33,334 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत एकूण 4,50,09,248 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत 4,44,71,860 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, 220 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत.