मदुराई: गेल्या काही महिन्यांपासून अशी अनेक प्रकरणे सातत्याने पाहायला आणि ऐकायला मिळत आहेत. ज्यामध्ये कधी चालताना (Walking) तर कधी नाचताना (Dancing) हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) लोकांचा मृत्यू (Death) होत आहे. जे खूप आश्चर्यकारक आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या घटनांमध्ये अल्पवयीन मुले आणि विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. जे कार्डियाक अरेस्टचे (Cardiac Arrest) बळी ठरले आहेत. अशीच एक घटना मदुराईमध्ये उघडकीस आली आहे. 10 किलोमीटर मॅरेथॉनमध्ये धावणारा 20 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी कार्यक्रमाच्या एक तासानंतर बेशुद्ध पडला (student dies of cardiac arrest after marathon) आणि दोन तासांनंतर अचानक हृदयविकाराच्या झटक्याने हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला.
[read_also content=”विषारी गर्लफ्रेंडला अखेर पोलिसांनी केली अटक! सापाला चावायला लावून घेतला होता बॅायफ्रेंडचा जीव https://www.navarashtra.com/crime/mahi-who-killed-her-lover-with-a-snake-was-arrested-by-the-police-nrps-436001.html”]
मृत विद्यार्थी मदुराई येथील थियागराजर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये बीई मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. मदुराई मेडिकल कॉलेजने आयोजित केलेल्या ‘उथिरम 2023’ रक्तदान जनजागृती मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या 4,500 स्त्री-पुरुषांमध्ये त्यांचा समावेश होता. राज्यभरातील विविध जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते.
वैद्यकीय महाविद्यालयात सकाळी 6 च्या सुमारास आरोग्य मंत्री मा सुब्रमण्यम आणि व्यावसायिक कर मंत्री पी मूर्ती यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. सहभागी स्पर्धकांना 10 किमी अंतर कापून महाविद्यालयात परतायचे होते. मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर सुमारे तासाभरानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने दिनेशकुमार शौचालयात गेला.त्याला अस्वस्थ होताना पाहून विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी त्याला ताबडतोब जवळच्या वैद्यकीय पथकाला सूचित केले.
धनेशकुमारला लवकरच रुग्णवाहिकेत नेण्यात आले आणि सकाळी 8.45 च्या सुमारास GRH च्या आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. “त्याला रक्तदाब आणि नाडी कमी असल्याचे आढळून आले. आम्ही त्याला जीवरक्षक उपचार दिले असले तरी, त्याला रुग्णालयात दाखल केले तेव्हा तो बेशुद्धच होता. त्यानंतर तरुणाला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि सकाळी 10.45 वाजता उपचाराला प्रतिसाद न देता त्याचा मृत्यू झाला. अशी माहिती रुग्णालयाचे डीन डॉ. ए. रथिनावेल यांनी दिली.