
अंत होने वाला है! 'या' राज्यात तब्बल 22 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; प्रत्येकावर होते 1 लाखांचे बक्षीस
22 नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण
ओडीशामध्ये या वर्षातील ठरले सर्वात मोठे आत्मसमर्पण
मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद नष्ट करण्याचा निर्धार
केंद्र सरकारने नक्षलवादाच्या विरुद्ध कडक कारवाई सुरू केली आहे. मार्च 2026 पर्यंत देशातील नक्षलवाद नष्ट करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. एकतर शरण यावे किंवा सुरक्षा यंत्रणेची गोळी खावी असे दोनच पर्याय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद्यांच्या समोर ठेवले आहेत. दरम्यान ओडीशा राज्यात एकाच वेळी तब्बल 22 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
ओडीशा राज्यातील मलकानगिरी जिल्ह्यात 22 नक्षलवाद्यांनी सामूहिकरित्या आत्मसमर्पण केले आहे. या 22 नक्षलवाद्यांच्या डोक्यावर 1 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांना आर्थिक मदत केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. या वर्षातील ओडीशामधील सर्वात मोठे आत्मसमर्पण आहे.
शरण आलेल्या नक्षलवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मागच्या काही काळामध्ये विविध राज्यात अनेक नक्षलवाद्यांनी मोठ्या प्रमाणात आत्मसमर्पण केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये एक विभागीय समिती सदस्य, 6 एसीएम आणि 15 पक्ष सदस्यांचा समावेश आहे.
अमित शहांनी नक्षलवाद्यांना ठणकावले
भारत सरकारने गेल्या काही महिन्यांपासून नक्षलवाद्यांच्या विरुद्ध मोठी मोहीम राबवत आहे. भारतीय सुरक्षा दलांनी आपली कारवाई तीव्र केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादापासून पूर्णपणे मुक्त होईल, असे मोठे विधान केले आहे. दरम्यान नक्षलवाद्यांनी केंद्र सरकारकडे युद्धविराम करण्याचा प्रस्ताव धाडला होता. हा प्रस्ताव आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी धुडकावून लावला आहे
“गोळ्यांचे शिकार व्हा किंवा…”; युद्धविराम नाहीच; अमित शहांनी नक्षलवाद्यांना ठणकावले
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद्यांना मोठा इशारा दिला आहे. नक्षलवाद्यांनी पाठवलेला शांततेचा प्रस्ताव केंद्र सरकारने धुडकावून लावला आहे. सरकार युद्धविराम करण्याच्या बाजूने नसल्याने अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. एकतर शस्त्रे टाकून आत्मसमर्पण करावे किंवा सुरक्षादलांच्या गोळ्यांचे शिकार व्हा, हे दोनच पर्याय नक्षलवाद्यांच्यासमोर असल्याचे अमित शहा म्हणाले आहे.
अमित शहा म्हणाले, “नुकतेच एक पत्र लिहून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला. या पत्रात युद्धविराम होयला हवा असे सांगण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारचा युद्धविराम होणार नाही, हे मी स्पष्टपणे सांगतो. आत्मसमर्पण करायचे असेल तर युद्धविरामाची आवश्यकता नाही. मात्र आता बोलणी नाही तर कठोर कारवाई केली जाणार आहे. ज्याचे लक्ष्य नक्षलवाद्यांना नष्ट करणे हाच आहे.