Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केदारनाथ मंदिरातून 228 किलो सोनं गायब? मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले सत्य

केदारनाथ मंदिरातून 228 किलो सोने गायब झाल्याचा आरोप ज्योतिष पीठाच्या शंकराचार्यांनी केला होता. आता राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले असून काय म्हणाले जाणून घेऊया...

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 19, 2024 | 07:13 PM
केदारनाथ मंदिरातून 228 किलो सोनं गायब? मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले सत्य (फोटो सौजन्य-ट्विटर)

केदारनाथ मंदिरातून 228 किलो सोनं गायब? मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले सत्य (फोटो सौजन्य-ट्विटर)

Follow Us
Close
Follow Us:

काही दिवसांपूर्वीच ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केदारनाथ मंदिरातून 228 किलो सोने गायब असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपाचे अनेक ऋषी-मुनींनी खंडन केले. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी आरोप केल्यानंतर 5 दिवसांनी आता उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. ते म्हणाले की, अविमुक्तेश्वरानंद यांनी केलेले सर्व आरोप तथ्याच्या पलीकडे आहेत. यावेळी त्यांनी केदारनाथ धामसह चार धामांच्या विकासात पंतप्रधान मोदींच्या योगदानाबद्दलही सांगितले.

पुष्कर सिंह धामी शुक्रवारी (19 जुलै) माध्यमांशी संवाद साधला असून, यावेळी त्यांना स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केलेल्या आरोपांवर प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना सीएम धामी म्हणाले की, हे आरोप तथ्याच्या पलीकडे आहेत. उत्तर देताना धामी यांनीही आकडेवारी सांगितली. धामी म्हणाले की, मंदिराचे बांधकाम आणि जीर्णोद्धार झाल्यापासून आजपर्यंत इतके सोने मंदिरात आले नसते. अंदाज देताना ते म्हणाले की, आजपर्यंत त्यातील एक चतुर्थांशच मंदिरात पोहोचले असेल. या विषयावर जास्त काही बोलायचे नाही, कारण मंदिर समितीच्या ऋषी-मुनींनी याचा इन्कार केला आहे. ते म्हणाले की, ऋषी-मुनींनीही हा आरोप तथ्यापलीकडचा असल्याचे म्हटले आहे. यावेळी सीएम धामी म्हणाले की हे बाबा केदारनाथचे निवासस्थान आहे आणि जर कोणी बाबांच्या घरी असे कृत्य केले तर तो बाबांच्या नजरेतून सुटू शकत नाही.

नुकतेच अनंत अंबानींच्या लग्नासाठी स्वामी अविमुक्तेश्वरानंद मुंबईत पोहोचले होते. यादरम्यान त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचून त्यांची भेट घेतली. येथून निघताना स्वामींनी केदारनाथ मंदिरातून सोने गायब असल्याचा आरोप केला होता. आता पुष्कर सिंह धामीने आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. चार धामांच्या पुनर्बांधणीत दिलेल्या योगदानाबद्दल धामी यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.

Web Title: 228 kg gold meant for lining kedarnath temple goes missing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2024 | 07:13 PM

Topics:  

  • Pushkar Singh Dhami

संबंधित बातम्या

Murshidabad Violence: “धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ममता बॅनर्जी…”; मुर्शिदाबाद हिंसाचारावरून CM धामींची टीका
1

Murshidabad Violence: “धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ममता बॅनर्जी…”; मुर्शिदाबाद हिंसाचारावरून CM धामींची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.