26/11 Mumbai Attack: 26/11 हल्ल्याला 16 वर्षे पूर्ण! दहशतवादी हल्ल्यातील हे 5 गुन्हेगार कुठे आहेत?
भारतात ’26 नोव्हेंबर 2008′ ही तारीख कोणीही विसरू शकणार नाही. या दिवसाच्या आठवणीने आजही डोळे पाणावतात. डोळ्यांसमोर दहशतवादी हल्ल्याची चित्रे येतात. 16 वर्षांपूर्वी या दिवशी मुंबई जगातील सर्वात भीषण आणि क्रूर दहशतवादी हल्ल्यांची साक्षीदार बनली होती. लष्कर-ए-तैयबाचे 10 दहशतवादी बोटीच्या साहाय्याने समुद्रमार्गे मुंबईत घुसले होते आणि त्यांनी मुंबईत सर्वात मोठा दहशतवादी हल्ला केला होता.
देशासंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
त्यांनी गर्दीची ठिकाणे आणि प्रतिष्ठित इमारतींना लक्ष्य केले होते. 26 नोव्हेंबर 2008 च्या त्या रात्री मुंबईत अचानक संपूर्ण शहरात गोंधळाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले. मुंबईत एवढा मोठा दहशतवादी हल्ला झाल्याची सुरुवातीला कोणालाही कल्पना नव्हती. या हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला. हल्ल्यात 18 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 166 लोकांचा मृत्यू झाला आणि 300 हून अधिक लोक जखमी झाले. 26/11 चा हल्ला हा भारताच्या इतिहासातील सर्वात भयंकर आणि सर्वात विनाशकारी दहशतवादी घटनांपैकी एक आहे.(फोटो सौजन्य – pinterest)
26/11 मुंबई दहशतवादी हल्ला हा भारताच्या इतिहासातील सर्वात भीषण दहशतवादी हल्ला म्हणून आजही आठवणीत आहे. तब्बल 60 तास चाललेल्या या दहशतवादी हल्ल्यात 166 निष्पाप लोकांचा बळी गेला. हल्ल्यात सामील असलेल्या 10 दहशतवाद्यांपैकी 9 जाणांचा सुरक्षा दलाने खात्ना केला, तर पोलिसांना अजमल आमिर कसाबला जिवंत पकडले. मात्र, हा हल्ला केवळ या 10 दहशतवाद्यांचे काम नव्हते. यामागे पाकिस्तानात बसलेल्या लष्कर-ए-तैयबा आणि आयएसआयच्या कटकारस्थानांचा डाव होता, जे अजूनही पाकिस्तानात जिवंत आणि सुरक्षित आहेत.
देशासंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक आणि हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईद होता. हाफिज सईद पाकिस्तानात राहतो आणि त्याला अनेकवेळा नजरकैदेत ठेवण्यात आले होते, परंतु अनेकदा सोडून दिले जाते. त्याला पाकिस्तानात राजकीय संरक्षण दिले जाते. संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेने त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे.
लख्वी हा लष्कर-ए-तैयबाचा ऑपरेशनल चीफ आणि हल्ल्याचा एक सूत्रधार होता. त्याला पाकिस्तानात अटक करण्यात आली होती, मात्र 2015 मध्ये त्याची जामिनावर सुटका झाली. तो अजूनही पाकिस्तानात मुक्तपणे फिरत आहे. हल्ल्यांसाठी त्याने दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले होते आणि त्याने संपूर्ण दहशतवादी कारवायांवर देखरेख ठेवली होती.
हेडली हा अमेरिकेत राहणारा पाकिस्तानी वंशाचा व्यक्ती आहे, ज्याने या हल्ल्यासाठी गुप्तचर माहिती गोळा केली आणि मुंबईतील ठिकाणांचा शोध घेतला. तो अमेरिकेच्या तुरुंगात बंद आहे. त्याला 35 वर्षांची शिक्षा झाली आहे, मात्र भारताने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. या हल्ल्यासाठी त्याने लष्कर-ए-तैयबा आणि आयएसआयमध्ये समन्वय साधला होता.
माजिद मीर हा लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर होता, जो हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांना सूचना देत होता. तो पाकिस्तानात लपून बसल्याचे सांगितलं जात आहे. त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी भारताने अनेकदा केली आहे. मीरचे नाव अमेरिका आणि भारताच्या मोस्ट वाँटेड यादीत आहे.
मुंबई हल्ल्याच्या वेळी जिंदाल पाकिस्तानच्या कंट्रोल रूममधून दहशतवाद्यांना सूचना देत होता. अबू जिंदालला 2012 मध्ये सौदी अरेबियातून भारतात आणण्यात आले होते. तेव्हापासून तो भारतीय तुरुंगात आहे. त्यांनी दहशतवाद्यांना हिंदी शिकविले जेणेकरून ते भारतीय नागरिकांमध्ये मिसळू शकतील.