एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का; पुण्यातील बडा नेता धनुष्यबाण हाती घेणार
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार गट)-शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्या महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला असून, महायुतीला चांगले यश मिळाले आहे. आता मुख्यमंत्रिपदावरून भाजप आणि शिवसेनेत चढाओढ सुरु आहे. असे असताना विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेदेखील वाचा : अखेर ठरलं ! राज्यातील ‘या’ बड्या नेत्याला मिळणार मुख्यमंत्रिपद; भाजपच्या बैठकीत झालं एकमत
विधानसभेची रीतसर स्थापना झाल्यानंतर आता उत्सुकता नवीन सरकारच्या शपथविधीची आहे. तत्पूर्वी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. मावळत्या विधानसभेची मुदत आज (दि.26) अखेरीपर्यंत आहे. त्यामुळे मंगळवारी सायंकाळपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन आपला व मंत्रिमंडळाचा राजीनामा देतील. याबाबत घटनेची तरतूद नव्या विधानसभेची स्थापना होताना जुन्या सरकारचा राजीनामा यावा, अशी असली तरी आधी सत्तेत असणाऱ्या महायुतीलाच नवीन सरकार स्थापन करायचे आहे. त्यामुळे या स्थितीत एखादा दिवस पुढे जाऊ शकतो, असेही सांगण्यात येत आहे.
याशिवाय मावळत्या विधानसभेची मुदत मंगळवारपर्यंत असल्याने घटनात्मक पेचाचा मुद्दा उभा राहणार नाही, असे घटनातज्ज्ञ डॉ. अनंत कळसे यांनी सांगितले. जेव्हा निकाल विद्यमान सरकारी पक्षाच्या विरोधात जातो, तेव्हा मावळते मुख्यमंत्री निकाल लागल्याबरोबर लगेच राजभवनावर जाऊन पदाचा व मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर करतात.
महाराष्ट्रात सध्या परिस्थिती उलट
याबाबत नियमावली जरी असली तरी सध्या महाराष्ट्रात परिस्थिती उलट स्थिती असल्याने थोडा वेळ एकनाथ शिंदे घेऊ शकतात. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा होतो तेव्हा राज्यपाल त्यांना पुढची व्यवस्था होईपर्यंत कारभार पाहा, असे सांगतात. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईपर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्री राहतात.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी राहावे; शिंदे गटाची मागणी
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी शिंदे गटाने इच्छा व्यक्त केली आहे. भाजपने ‘बिहार पॅटर्न’ महाराष्ट्रात राबवावा, असे खासदार नरेश म्हस्के यांनी मत व्यक्त केले आहे. तर मराठा आरक्षणाचा प्रश्न एकनाथ शिंदेच सोडवू शकतात, त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्री करावे, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्ता शीतल म्हात्रे यांनी केली आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Elections 2024 : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार की शिंदे राहणार? आता महाराष्ट्राची सत्ता कोणाच्या हातात येणार?