26/11 Mumbai Attack: दहशतवादी, गोळीबार आणि निष्पाप लोकांचा मृत्यू! वाचा 26/11 हल्ल्याची कहाणी
26 नोव्हेंबर 2008 हा दिवस मुंबईतील कोणतीही व्यक्ति कधीही विसरू शकणार नाही. या दिवशी अनेकांनी त्यांच्या जवळच्या व्यक्तिंना गमावलं आहे. या दिवशी शेकडो निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. हाेय, आम्ही 26/11 च्या हल्ल्याबद्दल बोलत होतो. आजही हा दिवस काळा दिवस म्हणजेच ब्लॅक डे मानला जातो. एकीकडे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तर याच दिवशी अनेकजण त्यांच्या जिवासाठी झटत होते. 26 नोव्हेंबरला मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यामध्ये शेकडो निष्पाप लोकांनी त्यांचा जीव गमावला.
देशासंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत दहशतवादी हल्ला करण्यात आला. आज या हल्ल्याला 16 वर्षे पूर्ण झाली. इतक्या वर्षांनंतर देखील या दिवसाची आठवण अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणते. आजही हा दिवस आठवून देशवासीय थरथर कापतात. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. या हल्ल्यात 18 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 166 लोकांचा मृत्यू झाला आणि 300 हून अधिक लोक जखमी झाले. देशातील सर्वात सुरक्षित ठिकाणांपैकी एक असलेल्या मुंबईतील ताज हॉटेलवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.(फोटो सौजन्य – pinterest)
मच्छिमार असल्याचे भासवून दहशतवादी सागरी मार्गाने मुंबईत पोहोचले होते. सर्व 10 दहशतवादी पाकिस्तानातील कराची येथून बोटीने मुंबईला रवाना झाले होते. ते समुद्रमार्गेच मुंबईत दाखल झाले. भारतीय नौदलाला चकमा देण्यासाठी, त्यांनी वाटेत एका भारतीय बोटीचं अपहरण केलं आणि जहाजावरील सर्व लोकांना ठार केले.
देशासंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
या बोटीचा वापर करून दहशतवादी रात्री आठच्या सुमारास कुलाब्याजवळील मासळी मार्केटमध्ये उतरले. यावेळी तेथील स्थानिक मच्छिमारांना दहशतवाद्यांवर संशय आला. याबाबत त्यांनी पोलिसांनाही माहिती दिली होती. यानंतर सुरुवात झाली मुंबईतील दहशतवादी हल्ल्याला.
कुलाब्यातून दहशतवादी प्रत्येकी 4 जणांच्या गटाने टॅक्सी घेऊन आपापल्या ठरलेल्या जागेवर निघाले. रात्री 9.30 वाजता दहशतवाद्यांची एक टोळी छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकावर पोहोचली. प्रत्येकाच्या हातात एके-47 रायफल होत्या आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरूवात केली. या हल्लेखोरांमध्ये अजमल कसाबचाही समावेश होता. ज्याला सुरक्षा दलांनी जिवंत पकडले आणि त्याला फाशी देण्यात आली. सीएसटी रेल्वे स्थानकावर झालेल्या गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. यानंतर काही वेळातच विलेपार्ले परिसरात गोळीबार झाल्याचेही वृत्त आले.
त्या रात्री दहशतवाद्यांनी मुंबईतील अनेक प्रसिद्ध ठिकाणांवर हल्ले केले. मुंबईतील जागतिक दर्जाच्या हॉटेलपैकी एक ताज हॉटेल, ओबेरॉय ट्रायडेंट हॉटेल आणि नरिमन हाऊस यांना लक्ष्य करण्यात आले. मुंबईची शान म्हटल्या जाणाऱ्या ताज हॉटेलला दहशतवाद्यांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केले होते. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये तीन दिवस चकमक सुरू होती. हे ऑपरेशन तीन दिवस चालले. यावेळी एनएसजी कमांडोंची मदत घेण्यात आली. एनएसजी कमांडोंनी सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यांच्या शौर्यामुळे भारतावर आलेले हे संकट टळले. या दहशतवाद्यांपैकी अजमल कसाबला पोलिसांनी जिवंत पकडले होते.