Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhattisgarh Naxal killed : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश; अबुझहमदमध्ये 26 हून अधिक नक्षलवादी ठार

Chhattisgarh Naxal killed : छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. आतापर्यंत सुरक्षा दलांनी अबुझहमाडमध्ये २६ हून अधिक नक्षलवाद्यांना ठार मारले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 21, 2025 | 12:58 PM
Naxalites are being killed by security forces in Abujamad in Chhattisgarh

Naxalites are being killed by security forces in Abujamad in Chhattisgarh

Follow Us
Close
Follow Us:

रायपूर: छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. अबुझहमदमध्ये सुरक्षा दलांनी वरिष्ठ नक्षलवादी कमांडरना घेरले आहे. नारायणपूर, दंतेवाडा, विजापूर आणि कोंडागाव या चार जिल्ह्यांमधून जिल्हा राखीव रक्षकांनी (DRG) ही कारवाई केली. या कारवाईत आतापर्यंत २६ हून अधिक नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. जंगली भागामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली.

छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा म्हणाले की, नक्षलग्रस्त नारायणपूर-बिजापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत २६ हून अधिक नक्षलवादी ठार झाले.  छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील अबुझहमद भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

नारायणपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक प्रभात कुमार म्हणाले की, जिल्ह्यातील अबुझमद भागातील माड विभागात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीच्या आधारे, जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) नारायणपूर, डीआरजी दंतेवाडा, डीआरजी विजापूर आणि डीआरजी कोंडागाव यांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी कारवाईसाठी रवाना करण्यात आले.

ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये अनेक मोठी नावे समाविष्ट 

बुधवारी सकाळी नारायणपूर जिल्ह्यातील अबुझहमाड जंगलात सुरक्षा दलांनी २६ हून अधिक नक्षलवाद्यांना ठार मारले. आतापर्यंत २० माओवाद्यांचे मृतदेह आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये मोठ्या कॅडर नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूर जिल्ह्यांच्या सीमेवर ही चकमक सुरू आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

गोळीबारात एक जवान जखमी

नक्षलवादी पॉलिटब्युरो सदस्य आणि नक्षलवादी संघटनेचे सरचिटणीस बसव राजू हे अबुझहमाडच्या बोटेरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्यावर १.५ कोटी रुपयांचे बक्षीस आहे. तथापि, राजू चकमकीत मारला गेला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राज्याचे गृहमंत्री विजय शर्मा यांनी या चकमकीची माहिती दिली आहे. त्यांच्या मते, गोळीबारात एक सैनिक जखमी झाला आहे. त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील करेगुट्टालू टेकड्यांमध्ये आणि आसपासच्या परिसरात सुरक्षा दलांनी ‘ब्लॅक फॉरेस्ट’ या नावाने नक्षलविरोधी मोठी मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण 214 नक्षलवादी लपण्याची ठिकाणं आणि बंकर उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. तर शोधमोहिमेदरम्यान एकूण 450 आयईडी, 818 बीजीएल शेल, 899 कोडेक्स, डेटोनेटर आणि मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय जवळपास 12 हजार किलोग्रॅम अन्नसाठादेखील जप्त करण्यात आला आहे.

Web Title: 26 naxalites killed by security forces in abujamad in chhattisgarh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2025 | 12:58 PM

Topics:  

  • Chhattisgarh
  • naxalism
  • Naxalites Attack

संबंधित बातम्या

Amit Shah on Naxalism: ‘३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादापासून मुक्त होईल’, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मोठे विधान
1

Amit Shah on Naxalism: ‘३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादापासून मुक्त होईल’, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मोठे विधान

Big Breaking: नक्षल्यांनो खबरदार! विजापूरच्या जंगलात चकमकीचा थरार; शूर जवानांनी थेट..
2

Big Breaking: नक्षल्यांनो खबरदार! विजापूरच्या जंगलात चकमकीचा थरार; शूर जवानांनी थेट..

गोळ्यांच्या आवाजांनी थरारले छत्तीसगड; 1 कोटींचे बक्षीस असलेला कमांडर ठार; तर 10 नक्षलवाद्यांना थेट…
3

गोळ्यांच्या आवाजांनी थरारले छत्तीसगड; 1 कोटींचे बक्षीस असलेला कमांडर ठार; तर 10 नक्षलवाद्यांना थेट…

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; 6 नक्षलवाद्यांचा खात्मा
4

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; 6 नक्षलवाद्यांचा खात्मा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.