१० जूनला माओवाद्यांकडून देशव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. माओवाद्यांचा सर्वोच्च नेता बसव राजू चकमकीत हा मारला गेल्यानंतर केंद्र सरकारच्या निषेधासाठी हे बंदचे आवाहन करण्यात आलं आहे.
नक्षलवाद्यांच्या निर्मूलन मोहिमेला वेग देण्यात आला आणि एका धाडसी कारवाईत, वरिष्ठ नक्षलवादी कमांडर आणि सीपीआय (माओवादी) च्या सरचिटणीस नंबला केशवराय उर्फ बसवा राजू यांच्यासह २७ नक्षलवादी ठार झाले.
Chhattisgarh Naxal killed : छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. आतापर्यंत सुरक्षा दलांनी अबुझहमाडमध्ये २६ हून अधिक नक्षलवाद्यांना ठार मारले आहे.
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात आतापर्यंतची मोठी कारवाई करण्यात आली आहे. यात १९७ नक्षलवादी ठार झाले असून १५० हून अधित बंकर उदध्वस्त करण्यात आले आहेत. करेगुट्टा टेकडीवरही ही कारवाई करण्यात आली.
सुरक्षा दलांनी विजापूर जिल्ह्यातील इंद्रावती राष्ट्रीय उद्यानात नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यावर छापा टाकला, ज्यामध्ये ३१ नक्षलवादी मारले गेले. ही साहसी मोहीम केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नांचे परिणाम आहेत
विजापूरमधील या हल्ल्याने संपूर्ण राज्य हादरले आहे. सोमवारी कुत्रू भागात नक्षलवाद्यांनी जवानांनी भरलेल्या वाहनाला लक्ष्य केले. वाहनावर आयईडीचा स्फोट झाला. या स्फोटात नऊ जवान शहीद झाले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले. या दरम्यान, महाराष्ट्रातील गडचिरोलीत पोलिस आणि नक्षल्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन महिलांसह तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी (Naxalites Attack) उच्छाद घातला आहे. नक्षल्यांनी एका लोकप्रतिनिधीची पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून हत्या केली. 20 ते 30 च्या आसपास नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.