Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत गौरव ट्रेनमधील ४० प्रवाशांना अन्नातून विषबाधा,​ पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांवर केले उपचार

चेन्नईहून पुण्याला येणाऱ्या भारत गौरव ट्रेनमध्ये विषबाधा होऊन प्रवासी बळी पडल्याची बातमी आहे. सुमारे 40 प्रवाशांची प्रकृती खालावली. यानंतर सर्वांवर पुणे रेल्वे स्थानकावर उपचार करण्यात आले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 29, 2023 | 09:20 AM
भारत गौरव ट्रेनमधील ४० प्रवाशांना अन्नातून विषबाधा,​ पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांवर केले उपचार
Follow Us
Follow Us:

पुणे :  भारतीय रेल्वेकडून (Indian Railway) प्रवाशांना प्रवासादरम्यान स्वच्छ आणि चविष्ट अन्न पुरवण्यात येत  असा किती जरी दावा केला जात असला तरी नुकतंच रेल्वे प्रवासात दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना सध्या घडली आहे. चेन्नईहून पुण्याला येणाऱ्या भारत गौरव ट्रेनमधील (Chennai Pune Bharat Gaurav Train) सुमारे ४० प्रवाशांची प्रकृती अचानक बिघडली. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. ट्रेन पुणे स्टेशनवर पोहोचल्यानंतर स्टेशनवर सर्वांवर तातडीने उपचार करण्यात आले. या सर्व प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सर्व प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

[read_also content=”17 दिवसांनंतर अखेर उत्तरकाशीत सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या सर्व 41 कामगारांची सुटका! https://www.navarashtra.com/india/all-41-workers-trapped-in-silkyra-tunnel-in-uttarkashi-rescued-after-17-days-nrps-484561.html”]

मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईहून पुण्याकडे येणाऱ्या भारत गौरव यात्रेतील अनेक प्रवाशांची प्रकृती अचानक बिघडली. प्रवाशांनी ही बाब पुणे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. मध्यरात्री जेव्हा गाडी पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचली. यानंतर तात्काळ ससून रुग्णालयाचे कर्मचारी आणि डॉक्टर उपचारासाठी रेल्वे स्टेशनवर पोहोचले. ४० प्रवाशांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली.

सध्या सर्व ४० प्रवाशांची प्रकृती स्थिर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नसल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व ४० प्रवाशांची प्रकृती आता स्थिर आहे. पण, हे सर्वजण विषबाधेचे बळी ठरल्याचा संशय आहे. याबाबत आता रेल्वे प्रशासन अधिक तपास करत आहे.

Web Title: 40 passengers suffer from food poising in chennai pune bharat gaurav train nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2023 | 09:20 AM

Topics:  

  • Indian Railway

संबंधित बातम्या

Railways New Rule: आता खैर नाही… जनरल तिकीट घेऊन स्लीपर क्लासमध्ये चढताय; नव्या नियमामुळे बसेल मोठा दणका
1

Railways New Rule: आता खैर नाही… जनरल तिकीट घेऊन स्लीपर क्लासमध्ये चढताय; नव्या नियमामुळे बसेल मोठा दणका

राखेतून पैसाच पैसा… भारतीय रेल्वेचा सूपरप्लॅन! ‘या’ टाकाऊ वस्तूपासून करणार कोट्यवधींची बंपर कमाई
2

राखेतून पैसाच पैसा… भारतीय रेल्वेचा सूपरप्लॅन! ‘या’ टाकाऊ वस्तूपासून करणार कोट्यवधींची बंपर कमाई

रेल्वेतून आता विनातिकीट प्रवास करू नकाच; दंडाच्या रकमेत झाली भलीमोठी वाढ
3

रेल्वेतून आता विनातिकीट प्रवास करू नकाच; दंडाच्या रकमेत झाली भलीमोठी वाढ

पुणे-साईनगर शिर्डी दरम्यान पहिली दैनंदिन एक्सप्रेस सुरू; रेल्वेमंत्री आज दाखवणार हिरवा झेंडा
4

पुणे-साईनगर शिर्डी दरम्यान पहिली दैनंदिन एक्सप्रेस सुरू; रेल्वेमंत्री आज दाखवणार हिरवा झेंडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.